कर्जमाफीची अंमलबजावणी न झाल्यास तीव्र आंदोलन करणार
By Admin | Published: June 13, 2017 05:42 PM2017-06-13T17:42:59+5:302017-06-13T17:42:59+5:30
किशोर ढमाले : शेतकºयांची प्रथमच अभूतपुर्ण एकजूट
आॅनलाईन लोकमत
धुळे,दि.१३ : राज्य सरकारने सरसकट कर्जमाफी देण्याची घोषणा केली असली तरी २५ जुलैला विशेष अधिवेशनात पुरवणी अर्थसंकल्पात कर्जमाफीची तरतुद न झाल्यास २६ जुलैपासून शेतकरी आंदोलनाची तीव्रता वाढविणार असल्याची माहिती सुकाणू समितीचे सदस्य तथा सत्याशोधक ग्रामीण कष्टकरी सभेचे संघटक किशोर ढमाले यांनी पत्रकार परिषदेत दिली़
राज्यात शेतकरी संपामुळे प्रथमच शेतकºयांची अभूतपुर्व एकजूट दिसून आली़ ११ जुनला अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यासमवेत शेतकरी सुकाणू समितीची सह्याद्री अतिथीगृह, मुंबई येथे बैठक झाली़ या बैठकीत शेतकºयांना सरसकट कर्जमाफी दिली जाणार असून निकष ठरविण्यासाठी ५ मंत्रीगटातील सदस्य व ५ शेतकरी सुकाणू समितीतील सदस्यांची समिती तयार करण्यात आली आहे़ अल्पभूधारक व थकीत कर्जदारांऐवजी सरसकट हा शब्दप्रयोग झाल्याने कर्जमाफीसाठी एकराची मर्यादा राहिलेली नाही़ २९ मागण्यांचे निवेदन शासनाला सादर केले असून उर्वरीत मागण्यांवर शासन लेखी उत्तर देणार आहे़ जर या मागण्यांची अंमलबजावणी २५ जुलैपर्यंत झाली नाही तर २६ जुलैपासून रूपरेषेनुसार बेमुदत रेलरोको करण्यात येईल, असे किशोर ढमाले म्हणाले़ यावेळी रवि देवांग, सुभाष काकुस्ते, वंजी गायकवाड, यशवंत मालचे, कडूतात्या अकलाडे, शशिकांत भदाणे, पोपट कुवर, गुलाबसिंग रघुवंशी, जगन राजपूत, मन्साराम पवार हे उपस्थित होते़