आरोप सारखे असतील तर भेदाभेद कशाला?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2019 06:18 PM2019-02-13T18:18:50+5:302019-02-13T18:20:13+5:30

कामगार न्यायालय : संतोष मडावी प्रकरण

If there is a similar allegation, then why the discrimination? | आरोप सारखे असतील तर भेदाभेद कशाला?

आरोप सारखे असतील तर भेदाभेद कशाला?

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : आरोपाचे स्वरुप व परिस्थिती सारखीच असेल तर शिक्षा देताना समानतेचे तत्व पाळणे आवश्यक आहे़ असा निर्वाळा देऊन एसटी महामंडळाचे शहादा डेपोतून बडतर्फ झालेले चालक संतोष लक्ष्मण मडावी यांना कामगार न्यायाधीश एम़ एम़ राव यांनी पूर्ववत मागील वेतन व सेवा अखंड धरुन नोकरीत पुन:स्थापित करण्याचा हुकूम देवून दिलासा दिला आहे़  
संतोष मडावी हे शहादा एसटी डेपोत २०११ मध्ये चालक पदावर नोकरीवर असताना २१ मे २०१४ रोजी शहादा - खेतिया या मार्गावर महामंडळाची बस चालवून नेत असताना रायखेडच्या अलिकडे बसच्या पुढे एक मोटारसायकल स्वार डबलसीट जात होता़ त्याला रस्त्यावर पाण्याचा ड्रम पडलेला दिसला़ त्याने अचानक मोटारसायकल थांबविली़ त्यावेळी बसचालकाने अपघात होऊ नये म्हणून बस उजव्या बाजुने घेतली़ त्यात मोटारसायकलला निसटता धक्का लागल्याने मोटारसायकल स्वार रस्त्यावर पडले़ त्यात त्यांना किरकोळ दुखापत झाली़ मात्र, त्याचवेळी समोरुन एक मोटारसायकलस्वार डबलसीट असल्याने बसवर जावून आदळला़ जबर जखमी होऊन रस्त्यावर पडले़ दोघांना तातडीने रुग्णालयात दाखल केले असता त्यात त्यांचा मृत्यू ओढवला़ 
या अपघातास तक्रारदाराला जबाबदार धरुन त्याला नोकरीतून बडतर्फ करण्यात आले होते़ प्रकरण विवाद्य ठरल्याने कामगार न्यायालयात प्रकरण दाखल करण्यात आले़ चौकशीचे कामकाज न्यायाधीश एम़ एम़ राव यांच्यासमोर चालले़ व्यवस्थापनाने अशाच स्वरुपाच्या प्राणांतिक अपघातात संजयकुमार श्यामराव पाटील, दत्तात्रय देसले, गणेश पाटील, चुनीलाल पाटील या सर्व चालकांना कमी शिक्षा देवून नोकरीत कायम ठेवल्याची बाब तक्रारदारतर्फे दस्तऐवजांच्या पुराव्याने सिध्द झाली़ तसेच मोटारसायकल स्वाराजवळ अधिकृत परवाना नसल्याचा पुरावा देण्यात आला़ 
दोन्ही बाजुंचे पुरावे, युक्तीवाद विचारात घेवून कोर्टाने मडावी यांची बडतर्फी अयोग्य व बेकायदेशीर ठरविली आहे़ तक्रारदारातर्फे अ‍ॅड़ पुंजाराम सानप यांनी कामकाज पाहीले़ 

Web Title: If there is a similar allegation, then why the discrimination?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.