शौचालय नसल्यास रेशनकार्ड होणार बाद!
By admin | Published: April 20, 2017 05:14 PM2017-04-20T17:14:39+5:302017-04-20T17:14:39+5:30
वारंवार सांगून देखील शौचालय न बांधणा:या नागरिकांचे आता रेशनकार्ड बाद करण्याचा निर्णय धुळे जि.प.ने घेतला आहे.
Next
धुळे,दि.20-जिल्ह्यात स्वच्छ भारत मिशन अंतर्गत प्रबोधनासह शौचालय बांधणे आणि त्याचा वापर करण्यासंदर्भात जनजागृती सुरु आह़े वारंवार सांगूनही आणि अनुदानाचा लाभ देवूनही अंमलबजावणी न करणा:या ग्रामस्थांना शासनाच्या कोणत्याही योजनांचा लाभ न देण्याच्या हालचाली जिल्हा परिषद प्रशासनामार्फत सुरु झाल्या आहेत़ सुरुवातीला रेशनकार्ड बाद होऊ शकते, अशी माहिती जिल्हा परिषदेच्या पाणी व स्वच्छता विभागातील सुत्रांनी दिली़
स्वच्छता विभागाकडून प्रबोधन
जिल्ह्यात स्वच्छ भारत अभियानातंर्गत शौचालय बांधणे आणि त्याचा वापर करण्यासंदर्भात प्रचार आणि प्रसार करण्याचे काम सध्या मोठय़ा प्रमाणावर होत आह़े ग्रामस्थांना याबाबत जनजागृती देखिल करण्यात येत आह़े विशेष म्हणजे ज्यांची आर्थिक परिस्थिती बेताची आहे, अशा कुटुंबाला शासनाकडून आर्थिक मदतीचा हात दिला जात आह़े आर्थिक मदत करुनही शौचालय बांधणे आणि त्याचा वापर करणे अशा बाबी होत नसतील तर अशा ग्रामस्थांच्या बाबतीत लवकरच कठोर निर्णय घेतला जाण्याची शक्यता वर्तविण्यात येत आह़े
25 टक्के कुटुंब दूरच
जिल्ह्यातील एकूण कुटुंबापैकी 75 टक्के कुटुंबाकडे शौचालय आहेत़ त्याचा नियमित वापर देखील होत आह़े असे असलेतरी उर्वरीत 25 टक्के अद्यापही उघडय़ावरच शौचास जात असल्याचे चित्र आकडेवारीवरुन समोर आलेले आह़े 55 हजार 882 पैकी 42 हजार 568 कुटुंब शौचालयाचा नियमित वापर करत आह़े उर्वरीत कुटुंब शौचालयाचा वापर करत नसल्यामुळे ही स्थिती समोर आलेली आह़े
ग्रामस्थांनी शौचालयाचा वापर करायला हवा, यासाठी वेळोवेळी त्यांचे प्रबोधन करण्याचे काम प्रशासनाच्या माध्यमातून सुरु असत़े वैयक्तिक शौचालयाचे काम ज्या गावात कमी प्रमाणात झालेले आहे, अशा गावातील ग्रामसेवकांची सुनावणी घेण्यात आलेली होती़ ग्रामस्थांमध्ये शौचालयाबाबतची जनजागृती केली जात आह़े त्यासाठी विभागालाही सूचना देण्यात आलेल्या आहेत़ तसेच ज्यांच्याकडे शौचालय नाही अशा नागरिकांची माहिती संकलित करण्याचे काम सुरु झाले आह़े
- ओमप्रकाश देशमुख, मुख्य कार्यकारी अधिकारी