धुळ्य़ात मनपा शाळांच्या दुरूस्तीकडे दुर्लक्ष
By admin | Published: June 15, 2017 12:26 PM2017-06-15T12:26:13+5:302017-06-15T12:26:13+5:30
शहरात महापालिकेच्या 23 शाळा आहेत़ त्यापैकी 6 शाळा डिजीटल झाल्या असून 12 शाळा उर्दू तर 11 शाळा मराठी माध्यमाच्या आहेत़
ऑनलाईन लोकमत
धुळे, दि. 15 - धुळे शहरात पावसाळयाच्या पाश्र्वभूमीवर शाळांची आवश्यक दुरूस्ती यंदाही करण्यात आलेली नाही़ त्यामुळे जीव धोक्यात घालून विद्याथ्र्याना शिक्षण घ्यावे लागणार आह़े
शहरात महापालिकेच्या 23 शाळा आहेत़ त्यापैकी 6 शाळा डिजीटल झाल्या असून 12 शाळा उर्दू तर 11 शाळा मराठी माध्यमाच्या आहेत़ त्यापैकी बहूतांश शाळांच्या इमारती या ब्रिटीशकालिन असल्याने त्यांच्या दुरूस्तीची अत्यंत आवश्यकता आह़े किमान तात्पुरत्या स्वरूपात दुरूस्ती करून शैक्षणिक वातावरणाची निर्मिती होण्यासाठी करून द्यावी, असे पत्र मनपा शिक्षण मंडळाने गेल्या महिन्यात आयुक्तांना दिले होत़े मात्र तरीही शाळांच्या दुरूस्तीबाबत कोणतीही कार्यवाही झालेली नाही़
मनपा शाळांमध्ये प्रामुख्याने इमारतींची रंगरंगोटी, संपूर्ण छत दुरूस्ती, पाण्याची टाकी, दरवाजे, खिडक्या दुरूस्ती, वर्गखोल्यांवर फायबर पत्रे, स्वच्छतागृहे व शौचालये यांची दुरूस्ती, भिंतीला प्लास्टर, फळयाची निर्मिती, छताच्या पुढील बाजूची भिंत वाढविण, वर्गखोल्यांच्या फरशांची दुरूस्ती करणे, मनपा शाळा क्रमांक 14 च्या इमारतीचा स्लॅब गळत असल्याने भिंती ओल्या होत असून व्हरांडय़ात पावसाचे पाणी साचत असल्याने दुरूस्ती आवश्यक आह़े त्याचप्रमाणे इमारतीच्या उत्तर दिशेला संरक्षण भिंत व तारेचे कुंपण गरजेचे असून इमारतीच्या पुव्रेस गटारीला मुख्य गटारीस जोडून बंदीस्त करणे आवश्यक आह़े जुन्या इमारतीची एका बाजूची भिंत पुर्णपणे पडली आह़े मनपा शाळा क्रमांक 20 मध्ये चार वर्गखोल्यांच्या छतास प्लास्टर आवश्यक असून कॉन्फरन्स रूमसाठी वर्गाची दुरूस्ती गरजेची आह़े त्याचप्रमाणे वॉचमन रूम, पावसाचे पाणी साचत असून ते वाहण्यासाठी जलवाहिनीची गरज आह़े
काही शाळांची अवस्था अत्यंत दयनीय असून याठिकाणी अपघात होण्याचीही शक्यता असत़े गेल्या वर्षी मनपा शाळा क्रमांक दहाची भिंत पडली होती़ त्यामुळे अनेक वाहनांचे नुकसान झाले होत़े त्यानंतर शिक्षण मंडळाचे प्रशासन अधिकारी महेंद्र जोशी यांना नोटीसाही बजाविण्यात आल्या होत्या़