बालमजुरांच्या  शोध मोहिमेकडे दुर्लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2019 12:36 PM2019-06-30T12:36:32+5:302019-06-30T12:37:00+5:30

बालमजुरी निर्मूलन कार्यालयाकडूनच उदासीनता, साधी नोंद देखील नाही

Ignore the search for the child labor | बालमजुरांच्या  शोध मोहिमेकडे दुर्लक्ष

बालमजुरांच्या  शोध मोहिमेकडे दुर्लक्ष

Next

सुनील साळुंखे । 
शिरपूर : बालपण हे जीवनात आनंदाचे क्षण देणारे असते़ कसलीही चिंता कसलीही जबाबदारी राहात नाही़ मात्र काही बालकांवर बालपणात कष्ट करून पोटाची खळगी भरण्याची वेळ येते़ शिरपूर शहरासह तालुक्यात बालमजुरी करणाºयांची संख्या देखील कमी नाही़ परंतु बालमजुरी निर्मुलन करणारे कार्यालय मात्र, सुस्त असल्याचे चित्र दिसते़ तालुक्यात किती बालमजुर आहेत, त्याची साधी नोंद देखील नाही़ बालमजुरांना शिक्षणाचा मुख्य प्रवाहात आणण्यासाठी राष्ट्रीय बाल कामगार प्रकल्प समितीने काही वर्षापूर्वी केलेल्या प्रयत्नांमुळे  शहरातून शेकडो बालकांना मुख्य प्रवाहात आणण्यात यश आले होते़ परंतु जिल्ह्यात हजारो बालमजुर आहेत़ कचरा गोळा करणारे, लोखंड जमा करून विक्री करणारे, हॉटेल व इतर व्यवसायात काम करणारे, परिस्थिती बिकट असल्यामुळे शेतात काम करणारे बालमजुर, भीक मागणारे बालके तालुक्यासह जिल्ह्यात आहेत़ शासनाने सन २०१६ मध्ये बाल व किशोरवयीन प्रतिबंधक नियमन अधिनियम अंमलात आणला़ त्यामुळे त्याचवर्षी बालमजुरी निर्मुलन करणारे कार्यालयाने देखावा म्हणून कारवाई करून मुलांना मुख्य प्रवाहात आणले़ मात्र त्यानंतर अशा प्रकारची कारवाई या तालुक्यात झालेली नाही़ १४ ते १८ वयोगटातील किशोरवयीन बालकास धोकादायक व्यवसाय आणि प्रकियांमध्ये कामावर ठेवणे हा फौजदारी गुन्हा असला तरी जिल्ह्यात हजारो बालके धोक्याच्या ठिकाणी काम करतांना दिसत आहेत़ आता १८ वर्षाखालील बालक बालमजूर म्हणून गणले जात आहे़ बालमजुरांच्या संदर्भात तक्रार आल्याशिवाय हे कार्यालय कामच करीत नाही़ मागील काही वर्षापासून एकही बालमजुराला पकडण्यात आलेले नाही़
काय सांगतो कायदा ़़़़ 
१४ वर्षाआतील बालकास व्यवसाय व प्रकियांमध्ये काम करण्यास प्रतिबंध आहे़ १४ ते १८ वयोगटातील किशोरवयीन बालकास धोकादायक व्यवसाय व प्रकियांमध्ये कामगार ठेवणे हा फौजदारी गुन्हा आहे़ फौजदारी गुन्ह्यासाठी ६ महिने ते २ वर्षापर्यंत तुरूंगवासाची शिक्षा किंवा किमान २० हजार व कमाल ५० हजार इतका दंड किंवा दोन्हीही शिक्षा मालकास होवू शकतात़ गुन्ह्याची पुनरावृत्ती झाल्यास किमान १ ते ३ वर्षापर्यंत तुरूंगवासाची शिक्षा आहे़ बालकास किशोरवयीन बालकास कामावर ठेवल्याचे आढळल्यास पोलिसांशी संपर्क साधावा़
फक्त ४०० रूपये शिष्यवृत्ती ़़़़ 
बालमजूर दररोज १५० ते २०० रूपये कमवितात़ सरकारद्वारे त्यांना प्रत्येक महिन्याला ४०० रूपये शिष्यवृत्ती देण्यात येते़ त्यांच्या शिष्यवृत्तीत शासनाने वाढ करण्याची मागणी होत आहे़ बालमजुरीसाठी आई-वडीलही तेवढेच जबाबदार आहेत़ काही आई-वडीलांच्या व्यसनामुळे बालमजुरी फोफावत आहे़
१४ वर्षाखालील बालकास सर्वच व्यवसाय आणि प्रकियांमध्ये काम करण्यास प्रतिबंध लावण्यात आला आहे़ मात्र, या बालमजुरांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी जिल्ह्यात पाहिजे तसे प्रयत्न दिसत नाही़
१४ वर्षाखालील बालकास सर्वच व्यवसाय आणि प्रकियांमध्ये काम करण्यास प्रतिबंध लावण्यात आला आहे़ मात्र, या बालमजुरांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी जिल्ह्यात पाहिजे तसे प्रयत्न दिसत नाही़१४ वर्षाखालील बालकास सर्वच व्यवसाय आणि प्रकियांमध्ये काम करण्यास प्रतिबंध लावण्यात आला आहे़ मात्र, या बालमजुरांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी जिल्ह्यात पाहिजे तसे प्रयत्न दिसत नाही़

Web Title: Ignore the search for the child labor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Dhuleधुळे