बेकायदेशीरपणे गुरे नेणारे वाहन पकडले

By admin | Published: May 31, 2017 12:12 PM2017-05-31T12:12:03+5:302017-05-31T12:12:03+5:30

थाळनेर पोलिसांना कळवूनही ते घटनास्थळी एक तास उशिरा पोहचले.

Illegal cats caught the vehicle | बेकायदेशीरपणे गुरे नेणारे वाहन पकडले

बेकायदेशीरपणे गुरे नेणारे वाहन पकडले

Next

ऑनलाइन लोकमत

शिरपूर, जि. धुळे, दि. 30 - शिरपूर -चोपडा मार्गावरील भोरखेडा गावाजवळ बैल कत्तलीसाठी घेवून जाणा:या 3 वाहनांना गोरक्षकांनी पकडले.  या संदर्भात थाळनेर पोलिसांना कळवूनही ते घटनास्थळी एक तास उशिरा  पोहचले. 
 शिरपूर-चोपडा मार्गावरील भोरखेडा गावातील स्थानकाजवळ गोरक्षक प्रमुख शिवशंकर स्वामी, चेतन राजपूत, कोमल राजपूत, आधार राजपूत, मैथून गिरासे, सागर पाटील, जितेंद्र पाटील आदी बसलेले होते. शिरपूरकडून भरधाव वेगाने 3-4 वाहने आली व गतिरोधक असल्याने त्यांचा वेग कमी झाला. त्यावेळी गाडीत गुरे असल्याचा संशय गोरक्षकांना आल्याने त्यांनी लागलीच त्या वाहनचालकांना हटकले आणि वाहनात काय आहे? असे विचारले असता त्यांनी उडवाउडवीचे उत्तरे देवून वाहन सोडून पळ काढला़ त्यामुळे गोरक्षकांना संशय आल्याने त्यांनी वाहनाची ताडपत्री बाजूला करून पाहिले असता त्यात अत्यंत निर्दयीपणे जनावरे कोंबलेली आढळून आली़
या संदर्भात  गोरक्षकांनी थाळनेर पोलिसात कळविल़े मात्र घटनास्थळापासून थाळनेर हे गांव अवघे 7-8 किमी अंतरावर असतांना देखील पोलिस तब्बल  तासाभरानंतर घटनास्थळी पोहचल़े गाडी क्रमांक एम़एच़18-एए-7749, एम़एच़20-सीटी-5315 व एम़एच़18-एम-3192 अशा तीन वाहनांमध्ये तब्बल 22-23 बैल निर्दयीपणे कोंबलेले होत़े सदर बैल ब:हाणपूरकडे घेवून जाणार असल्याचे सांगण्यात आल़े
 यापूर्वी, दोन महिन्यापूर्वी देखील गोरक्षक समितीच्या पदाधिका:यांनी भोरखेडा गावाजवळ अनेक वाहने पकडली आहेत़ याशिवाय या मार्गावरून कत्तलीसाठी जनावरे घेवून जाणारे वाहने पोलिसांच्या आशिर्वादाने राजरोसपणे जात असल्याचा आरोपही ग्रामस्थांकडून होत आह़े त्यामुळे या प्रकरणाची गांभीर्याने नोंद घ्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

Web Title: Illegal cats caught the vehicle

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.