यात्रेत अवैध दारू विकणा:या नांदरखेडच्या उपसरपंचाला अटक
By admin | Published: May 21, 2017 12:52 PM2017-05-21T12:52:46+5:302017-05-21T12:52:46+5:30
साक्री तालुक्यातील उंभरफाटा यात्रोत्सवात अवैध दारू विकणा:यास शनिवारी मध्यरात्री पिंपळनेर पोलिसांनी अटक केली आहे.
Next
पिंपळनेर, जि.धुळे, दि.21- साक्री तालुक्यातील उंभरफाटा यात्रोत्सवात अवैध दारू विकणा:यास शनिवारी मध्यरात्री पिंपळनेर पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याकडून 2 लाख 12 हजार 278 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
पिंपळनेर पोलिसांना उंभरफाटा येथे सुरू असलेल्या यात्रोत्सवात एक जण अवैध दारू विक्री करत असल्याची गुप्त माहिती मिळाली होती. तत्काळ, पिंपळनेर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तेव्हा नांदरखेड येथील उपसरपंच कांतीलाल जयवंत कुंवर हा अवैध दारू विक्री करताना आढळून आला. पिंपळनेर पोलिसांनी त्याला अटक केली. त्याच्याकडून देशी, विदेशी प्रकारच्या दारूसह दोन लाखांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला असून त्याच्या विरोधात पिंपळनेर पोलीस स्टेशनला गुन्हा नोंदविण्यता आला आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील भाबड, योगेश खटकळ यांच्या पथकाने ही कारवाई केली.