अवैध गौणखनिजाचा पंचनामा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 3, 2018 11:02 PM2018-12-03T23:02:33+5:302018-12-03T23:04:22+5:30

जेसीबीसह साडेदहा लाखाचा साठा

Illegal mining panchnama | अवैध गौणखनिजाचा पंचनामा

अवैध गौणखनिजाचा पंचनामा

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
शिंदखेडा : तालुक्यातील पिंप्री गावशिवारात रविवारी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी अचानक भेट देऊन अवैधरित्या मुरूम व गौण खनिजाचा सुमारे ४० ब्रास साठा  पकडला. जेसीबीसह सुमारे साडेदहा  लाख रुपयांचा हा साठा आहे. रात्र झाल्याने सोमवारी जिल्हाधिकारी पुन्हा सकाळी येथे दाखल झाले. त्यांच्यासमक्ष अवैध गौणखनिज साठ्याचा पंचनामा करण्यात आला.
३ रोजी सकाळी सात वाजेच्या सुमारास जिल्हाधिकारी राहुल  रेखावार, शिंदखेडा तहसीलदार सुदाम महाजन, चिमठाणे महसुल मंडळाधिकारी एस.बी मसलकर, चिमठाणे तलाठी भीमराव बाविस्कर, अमराळे तलाठी नवनीत पाटील, सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक अतुल चव्हाण, पोलीस उपनिरीक्षक ए.एन. पाटील, दोंडाईचा सार्वजनिक बांधकाम उपविभागाचे कनिष्ठ अभियंता हेमंत गोसावी आदींना पिंपरी गाव शहरातील गट क्रमांक ४३/३ वरील ४० आर क्षेत्रात अवैधरित्या मुरूम व गौण खनिजाचा साठा केल्याचे आढळून आले. 
 पंचनाम्यात पिवळ्या रंगाचे एक विना क्रमांकाचे जेसीबी मशीन आढळून आले. मुरूम या गौणखनिजाचे अवैद्यरित्या उत्खनन व वाहतूक व साठवणूक केल्याप्रकरणी शेतमालक किरण विठ्ठल नगराळे रा.चिमठाणे यांना एकूण १० लाख ३१ हजार ८६५ रुपये दंडाची नोटीस तहसीलदारांकडून देण्यात आली आहे.  तसेच मंडळ अधिकारी मसळकर यांना पोलिसात गुन्हा दाखल करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. 
तालुक्यात प्रथमच इतकी मोठी कारवाई करण्यात आल्याने अवैध गौणखनिज वाहतूकदारांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले  आहे. 
अवैध वाळू उपसा सुरुच
दरम्यान, परसामळ चिरणे, कदाने, अलाने, दरखेडा, महाळपूर, बाभुळदे, दलवाडे, आमराळे शिवारात व बुराई नदीत अद्याप कारवाई झालेली नसल्याने तेथे अजूनही राजरोसपणे अवैध वाळू उपसा सुरु आहे. जिल्हाधिकाºयांनी नदीत पडलेल्या खड्ड्याची पाहणी ड्रोनच्या सहाय्याने करावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.

Web Title: Illegal mining panchnama

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Dhuleधुळे