पोलिसांच्या नाकावर टिच्चून अवैध वाहतूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 3, 2019 01:38 PM2019-11-03T13:38:27+5:302019-11-03T13:39:22+5:30

शहर वाहतूक शाखेचा प्रकार। एकासाठी कारवाईचे उदिष्टे झाल्यावर कारवाईकडे केले जाते दुर्लक्ष

Illegal traffic on the nose of the police | पोलिसांच्या नाकावर टिच्चून अवैध वाहतूक

dhule

Next

धुळे : शहरात रिक्षा, टॅक्सी, खाजगी बस चालकांकडून नियमांचे उल्लंघन करून जीवघेणी प्रवासी वाहतूक केली जात आहे़ तर वर्दळीच्या ठिकाणी अवजड वाहनांना बंदी असतांना देखील चालक वाहतूक पोलिसांच्या नाकावर टिच्चून वाहन नेतात़ त्यामुळे सर्वसामान्य धुळेकरांना वाहतुकीच्या समस्यांना सामोरे जावे लागते़
शहरात अवैध प्रवासी वाहतूकीच्या प्रमाणात वाढ होत आहे़ जीवघेण्या पध्दतीने प्रवासी नेणाऱ्या वाहनांवर वाहतूक शाखेचा जराही अंकुश नाही़ त्यामुळे केवळ कारवाईचे ‘टार्गेट’ पूर्ण करण्यावर वाहतूक पोलीस शाखेचा भर असतो़ शहराच्या चौफेर दिसणारी अवैध प्रवासी वाहतूक आणि जीवाचा विचार न करता वाहनाच्या मागे लोंबकळत प्रवाशांची वाहतूक केली जाते़ मात्र वाहतूक पोलिसांकडून त्याकडे दुर्लक्ष केले जाते़ त्यामुळे शहरात बोकाळलेल्या अवैध वाहतुकीच्या प्रमाणात वाढ होत आहे़
शहरतील कमलाबाई चौक, पारोळारोड, संतोषीमाता मंदीर चौक, दत्त मंदिर चौक, पाटबाजार, फुलवाला चौक, पाच कंदील, आग्रारोड अशा मुख्य चौकांत नेहमीच मोठी वर्दळ होते़ याठिकाणी वाहतुकीची समस्या सोडविण्यासाठी वाहतूक पोलीस नियुक्त केले आहेत़ मात्र वाहतुकीचे नियमन करतांना चालकाकडून नियम मोडले जातात. त्यामुळे वाहतुकीची कोंडी निर्माण होते़ प्रशासनाने नियमांचे उल्लंघन करणाºया चालकांवर कठोर कारवाईची गरज असतांना त्याकडे मात्र दुर्लक्ष केले जाते़ त्यामुळे अवैध करणाºया वाहनांच्या संख्येत वाढ झाली आहे़
शहर वाहतूक शाखेने वेळकाढूपणा सोडून शहरातील बेशिस्त पार्किंग, अवैध वाहतुकीचा प्रश्न सोडविण्याची गरज आहे़

Web Title: Illegal traffic on the nose of the police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Dhuleधुळे