वाढत्या थंडीचा शिशुंच्या आरोग्यावर परिणाम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 4, 2020 10:54 PM2020-01-04T22:54:31+5:302020-01-04T22:55:07+5:30
संडे अँकर । वाढत्या थंडीपासून बचाव करावा, हिवाळ्यात आरोग्याची काळजी घेण्याची गरज
धुळे : ऐन हिवाळ्यात काही दिवसांपूर्वी झालेल्या अवकाळी पावसामुळे वातावरणात बदल झाला आहे. गार वाऱ्यामुळे थंडीतही वाढ झाल्याने त्याचा फटका नवजात शिशूंच्या आरोग्याला बसत आहे. अशा परिस्थितीत पालकांनी नवजात शिशूंची योग्य काळजी घेण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे.
जिल्ह्यातील तापमानाचा पारा घसरत चालला आहे़ त्यामुळे आठवड्याभरापासून थंड वारे वाहू लागले आहेत. त्याचा थेट परिणाम आरोग्यावर दिसून येत आहे. विशेष: नवजात शिशूंच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत आहे. नवजात शिशूंमध्ये रोगप्रतिकार शक्ती कमी राहते. त्यामुळे त्यांच्यावर कोणत्याही विषाणूंसह जंतूचा संसर्ग होण्याचा धोका जास्त असतो. त्याचा परिणामही बाल रुग्णांवर दिसू लागला आहे़ बालरोग तज्ज्ञांकडे येणाºया रुग्णांमध्ये एक वर्षाआतील बाल रुग्णांची संख्या वाढल्याचे दिसून येत आहे.
एक वर्षाआतील बालकांना कुठल्याच प्रकारचा आजार होऊ नये, या दृष्टिकोनातून प्रत्येक पालकाने विशेष काळजी घेण्याची गरज असल्याचे देखील डॉक्टरांकडून सांगण्यात येत आहे.
जेष्ठ नागरिकांच्या आरोग्याच्या तक्रारी वाढल्या
गेल्या काही दिवसांत किमान तापमान ९ ते १० अंशांपर्यंत घटले आहे़ त्यामुळे थंडीचे प्रमाणही वाढले आहे़ मात्र चार दिवसांपासून थंडीचा मुक्काम वाढल्याने किमान तापमानात घट होत असून दिवसभर थंडगार वारे वाहतात़ त्यामुळे नागरिकांना व चिमुकल्या विद्यार्थ्यांना घराबाहेर पडतांना स्वेटर, टोपी, मफलर, जॅकेटचा आधार घेत आहे़ त्यासाठी शहरात विक्रेत्याही दुकाने थाटली आहे़ दरम्यान नागरिक शेकोटी पेटवून ऊब घेण्यावरही भर दिला जात आहे़