मंजूर वीज उपकेंद्र त्वरित कार्यान्वित करा
By Admin | Published: January 10, 2017 11:57 PM2017-01-10T23:57:41+5:302017-01-10T23:57:41+5:30
मालपूर येथे उपकेंद्रासाठी जागा मंजूर असतानाही उपकेंद्र कार्यान्वित केले जात नसल्यामुळे ग्रामस्थांना अडचणी येत आहे.
मालपूर : शिंदखेडा तालुक्यातील मालपूर येथे विद्युत वितरण कंपनीचे वीज उपकेंद्र मंजूर असून ते त्वरित कार्यान्विय करून येथील शेतक:यांचा रब्बी हंगाम वाचवावा, अशी मागणी येथील शेतक:यांनी केली आहे. उपकेंद्रासाठी जागा मंजूर असतानाही उपकेंद्र कार्यान्वित केले जात नसल्यामुळे ग्रामस्थांना अडचणी येत आहे.
तालुक्यातील मालपूर येथे 33-11 क्षमतेचे वीज उपकेंद्र गेल्या वर्षभरापासून मंजूर आहे. मात्र विद्युत वितरण कंपनीच्या कारभारामुळे ते अजून कार्यान्वित होताना दिसून येत नाही. याचा रब्बी हंगामातील पिकांना फटका बसणार असल्यामुळे शेतक:यांच्या चेह:यावर चिंता दिसून येत आहे.
मालपूरसह परिसरात रब्बी हंगामातील पिकांची लागवड व पेरणी पूर्ण झाली असून या पिकांना आता पाणी देण्याची गरज येऊन ठेपली आहे. रब्बीतील पीक हे विहिरींच्या पाण्यावरच अवलंबून असतात, यासाठी अखंडित व पूर्ण दाबाने वीज आवश्यक आहे, मात्र येथे उपकेंद्र नसल्यामुळे दोंडाईचा येथून विजेचा पुरवठा केला जातो.
दोंडाईचा येथून 20 कि.मी. दूर्पयत हा विजेचा पुरवठा होतो. ज्या विद्युत तारेतून पुरवठा होत असतो त्या खूप जुन्या व जीर्ण झाल्यामुळे तारा तुटून तांत्रिक बिघाड हा सतत होत असल्यामुळे मालपूर येथील मंजूर उपकेंद्र त्वरित कार्यान्वित होणे गरजेचे झाले आहे. झालेला तांत्रिक बिघाड शोधण्यासाठीदेखील खूप वेळ लागतो. यातच कधीकधी तर दिवस जातो. यामुळे शेती पिकांचेदेखील नुकसान होत आहे. तसेच 132 केव्ही दोंडाईचा येथून हा पुरवठा होतो. अंतर जास्त असल्यामुळे तसेच इतर गावांना देखील येथूनच वीजपुरवठा होत असतो. यामुळे विजेला पूर्ण दाब राहत नाही व शेतक:यांच्या यामुळे विद्युत मोटारीदेखील फिरत नसल्यामुळे हे उपकेंद्र त्वरित होणे आवश्यक आहे.
आधीच खरिपात या परिसरातील शेतकरी अस्मानी व सुलतानी संकटामुळे मोडून पडला आहे, आता संपूर्ण आशा रब्बीवर टिकून आहेत.