सासरच्या लोकांनी मुलीला आत्महत्येस प्रवृत्त केले, वडिलांची पोलिसात धाव

By देवेंद्र पाठक | Published: September 8, 2023 06:13 PM2023-09-08T18:13:53+5:302023-09-08T18:14:26+5:30

गुरुवारी फिर्याद दिल्यानंतर तीन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

In-laws push daughter to commit suicide, father runs to police | सासरच्या लोकांनी मुलीला आत्महत्येस प्रवृत्त केले, वडिलांची पोलिसात धाव

सासरच्या लोकांनी मुलीला आत्महत्येस प्रवृत्त केले, वडिलांची पोलिसात धाव

googlenewsNext

धुळे : सासरकडील लोकांकडून मुलीचा वारंवार छळ केला जात होता. याच जाचाला कंटाळून मुलीने गळफास घेत आत्महत्या केली, असा आरोप करत मयत मुलीच्या वडिलांनी शिंदखेडा पोलिसात धाव घेतली. गुरुवारी फिर्याद दिल्याने तीन जणांवर गुन्हा दाखल झाला. 

पूजा दीपक जगदाळे (वय २४, रा. देगाव ता. शिंदखेडा) असे मयत महिलेेचे नाव आहे. मयत पूजा जगदाळे हिचे वडील बालू दगा सोनवणे (वय ६५, रा. काकर्दे दिगर, ता. शहादा) यांनी फिर्याद दाखल केली. त्यानुसार, दीपक सोमा जगदाळे याच्याशी मुलगी पूजा हिचा विवाह लावून देण्यात आला होता. लग्न झाल्यानंतर काही ना काही कारणावरून मुलीला त्रास दिला जात होता. शारीरिक व मानसिक त्रासाला ती कंटाळली होती. पूजा हिच्या चारित्र्यावरही तिचा पती दीपक याच्याकडून संशय घेतला जात होता. सततच्या जाचाला कंटाळून पूजा हिने गळफास घेऊन जीवनयात्रा संपविली. 

ही घटना ५ सप्टेंबर रोजी पहाटे शिंदखेडा तालुक्यातील देगाव येथे घडली. तिला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप करत बालू दगा सोनवणे यांनी शिंदखेडा पोलिस ठाणे गाठत पोलिसांना आपबीती कथन केली. त्यानुसार, गुरुवारी दुपारी पावणे चार वाजेच्या सुमारास मुलीच्या पतीसह तीन जणांविरोधात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहायक पोलिस निरीक्षक गोरावडे घटनेचा तपास करीत आहेत.
 

Web Title: In-laws push daughter to commit suicide, father runs to police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.