शिव महापुराण कथेत सोनपोत लांबविणाऱ्या ३७ महिला धुळे कारागृहात, कथास्थळी पकडल्या गेल्या होत्या महिला

By विजय.सैतवाल | Published: December 9, 2023 08:02 PM2023-12-09T20:02:23+5:302023-12-09T20:02:51+5:30

या एकूण ३७ महिलांची शनिवार, ९ डिसेंबर रोजी पोलिस कोठडी संपल्याने तपासाधिकारी नयन पाटील यांनी त्यांना न्यायालयात हजर केले. त्या वेळी त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली व त्यांची धुळे कारागृहात रवानगी करण्यात आली.

In the story of Shiva Mahapurana the 37 women who were stolen gold chain were arrested | शिव महापुराण कथेत सोनपोत लांबविणाऱ्या ३७ महिला धुळे कारागृहात, कथास्थळी पकडल्या गेल्या होत्या महिला

प्रतिकात्मक फोटो

जळगाव : तालुक्यातील वडनगरी येथे सुरु असलेल्या श्री शिवमहापुराण कथास्थळी सोनपोत लांबविणाऱ्या ३७ महिलांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली असून त्यांची धुळे कारागृहात रवानगी करण्यात आली आहे. 

तालुक्यातील वडनगरी फाटा येथील बडे जटाधारी मंदिराजवळ श्री शिवमहापुराण कथा सुरु आहे. कथेच्या पहिल्याच दिवशी संशयितरित्या फिरणाऱ्या २७ महिलांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ताब्यात घेतले होते. दुसऱ्या दिवशी गुरुवारी पुन्हा कथेच्या ठिकाणाहून राजस्थान व मध्यप्रदेशातील १० जणांची टोळी जेरबंद करण्यात आली होती. या एकूण ३७ महिलांची शनिवार, ९ डिसेंबर रोजी पोलिस कोठडी संपल्याने तपासाधिकारी नयन पाटील यांनी त्यांना न्यायालयात हजर केले. त्या वेळी त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली व त्यांची धुळे कारागृहात रवानगी करण्यात आली.
 

Web Title: In the story of Shiva Mahapurana the 37 women who were stolen gold chain were arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.