मनपाच्या ‘जेट पावर प्रेशर’मशीन उदघाटन सार्वजनिक शौचालयाची स्वच्छता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 27, 2019 10:30 PM2019-12-27T22:30:11+5:302019-12-27T22:31:08+5:30

महापालिका केवळ बघ्याची भूमिका

 Inauguration of Jet Power Pressure Machine to clean toilets: help in solving problems of citizens | मनपाच्या ‘जेट पावर प्रेशर’मशीन उदघाटन सार्वजनिक शौचालयाची स्वच्छता

Dhule

googlenewsNext

धुळे : शहरातील चौका-चौकात वाढदिवसाच्या शुभेच्छा, श्रध्दाजंली तसेच व्यावसायिक जाहिरातीचे बॅनर्स होर्डिंग्ज बेकायदेशीररित्या झळकतांना दिसतात. याविरुद्ध कारवाई न करता महापालिका केवळ बघ्याची भूमिका घेतांना दिसते.
मुंबई उच्च न्यायालयाने एका याचिकेवर निर्णय देतांना १४ मार्च २०१३ मध्ये सर्व महानगरपालिका क्षेत्रातील अवैध होर्डिंग्ज व बॅनर्स हटविण्याचा आदेश दिले होते़ त्यानंतर महापालिकेने कारवाईचा देखावा करीत काही ठिकाणी कारवाई देखील केली होती़ काही दिवसांच्या कारवाईनंतर अवैध होर्डिंग्ज व बॅनर्स पुन्हा झळकू लागले आहेत़ किरकोळ कारवाई वगळता त्यानंतर अद्याप मोठी कारवाई केलेली दिसून आलेली नाही़
होर्डिंग्ज व बॅनर्समुळे शहर विद्रुप
शहरातील संतोषी माता चौफुली, कराचीवाला खुंट, पाच कंदील, बारा पत्थर, पारोळा चौफुली, स्वस्तिक चौक, जिल्हा रूग्णालय परिसर, दत्त मंदीर, नेहरू चौक, साक्रीरोड, आग्रारोड, वाडीभोकर रोड, लहान व मोठा पुल, गांधी पुतळा, अशा मुख्य ठिकाणी मोठ्याप्रमाणावर होर्डिंग लावण्यात आल्याचे ‘लोकमत’ च्या टीमने गुरुवारी सर्वेक्षण केले. त्यात वरील ठिकाणी मोठमोठे होर्डिंग्ज दिसून आले.
मनपाकडून नियमांचे उल्लंघन
कराचीवाला खुंट तसेच अन्य ठिकाणी वाहतूकीची कोंडी सोडविण्यासाठी वाहतूक शाखेकडून सिग्नल बसविण्यात आले होते. ते आता बंद आहे. पण ते सुरु करण्याचा प्रयत्न केला तर ते सिग्नलच कोणाला दिसत नाही अशी परिस्थिती आहे. कारण या सिग्नलाच्या दोन्ही बाजून मोठमोठे होर्डिंग्ज् लावण्यात आलेले आहे. त्यात काही तर महापालिका प्रशासनाने स्वच्छतेसंदर्भातील प्रबोधनात्मक होर्डिंग्ज् आहे. त्यामुळे मनपाने आता स्वत:लाच शिस्त लावण्याची गरज निर्माण झाली आहे.
यापूर्वी झाले होते वाद..
चित्रपटाची व अन्य प्रकारची जाहिरात करणारे होर्डिंग्ज व बॅनर्स शहरात मोठ्या प्रमाणात लावले जातात़ मनपाने यापुर्वी होर्डिंग्ज व बॅनर्ससाठी शहरात विशिष्ट जागा निश्चित करण्याचा निर्णय घेतला होता़ पण त्याबाबत पुढे काहीच निर्णय झाला नाही. धुळे शहरात होर्डिंग्ज् फाडण्यावरुन दंगलसुद्धा झालेली आहे. त्यामुळे शहराचे विदृ्रपीकरण करणारे आणि शहराची शांतता भंग करण्याचे कारण ठरणारे असे होर्डिंग मनपाने कोणाचाही मुलाहिजा न बाळगता काढले पाहिजे, अशी धुळेकरांची अपेक्षा आहे.

Web Title:  Inauguration of Jet Power Pressure Machine to clean toilets: help in solving problems of citizens

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Dhuleधुळे