म्युकरमायकोसिस, पोस्ट कोविड शासनमान्य आजारात समाविष्ट करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2021 04:26 AM2021-05-31T04:26:30+5:302021-05-31T04:26:30+5:30
धुळे : राज्यात आता कोरोनासोबतच म्युकरमायकोसिस व पोस्ट कोविडच्या आजारांनीदेखील थैमान माजविले आहे. त्यामुळे अनेक शासकीय कर्मचाऱ्यांचा व त्यांच्या ...
धुळे : राज्यात आता कोरोनासोबतच म्युकरमायकोसिस व पोस्ट कोविडच्या आजारांनीदेखील थैमान माजविले आहे. त्यामुळे अनेक शासकीय कर्मचाऱ्यांचा व त्यांच्या कुटुंबीयांचा जीव जात असून, अशा जीवघेण्या आजारांच्या वैद्यकीय खर्चामुळे सर्वसामान्य कर्मचाऱ्यांचे कंबरडे मोडत असल्याने या गंभीर आजारांचा समावेश शासनमान्य आजारात करावा, अशी मागणीचे पत्र भाजप शिक्षक आघाडीच्या वतीने मुख्यमंत्री पाठविले आले आहे.
राज्यात कोरोनामुळे अनेक आरोग्य सेवक, पोलीस , शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा व कुटुंबीयांचा मृत्यू झाला आहे. अनेकांनी या रोगावर मातदेखील केली. परंतु या रोगाचा रुग्णालयाचा खर्च खूपच जास्त असल्याने खर्चाच्या वैद्यकीय प्रतिपूर्तीकरिता शासनाने कोविड-१९ आजाराचा समावेश १७ डिसेंबर २०२०च्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या शासननिर्णयामुळे शासनमान्य आकस्मिक आजारात करण्यात आला होता तसेच ३० एप्रिल २०२१ च्या शुद्धिपत्रकाने कोविड-१९ आजार २१ मे २०२० पासून समाविष्ट करण्यात आला. परंतु आता कोविड-१९ या आजारामुळे म्युकरमायकोसिस, पांढरी बुरशी, काळी बुरशी, कावासाकी असे अनेक पोस्ट कोविडचे गंभीर आजार उद्भवण्याचे प्रमाण आता राज्यात वाढले आहे. या आजाराचे प्रमाण पुणे, मुंबई, नागपूर, अमरावती, नाशिक, धुळे, नंदुरबारसह हळूहळू संपूर्ण राज्यात वाढत आहे. अनेक कर्मचाऱ्यांनी व त्यांच्या कुटुंबीयांनी त्यांचे अवयव व जीवदेखील गमावला आहे. शासनाने पोस्ट कोविड या सर्व आजारांचा समावेश करावा, अशी मागणी डॉ. कल्पना पांडे, महेश मुळे, अनिल शिवणकर, प्र. ह. दलाल, भरतसिंह भदोरिया, ईश्वरभाई पटेल, अरविंद आचार्य, निशिकांत शिंपी, मनोहर चौधरी, महेंद्र फटकळ, दिनेश देवरे, अविनाश पाटील आदींनी केली आहे.