पाणीसाठ्याचा वापर करून सिंचन क्षेत्र वाढवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 15, 2019 10:56 PM2019-12-15T22:56:55+5:302019-12-15T22:57:31+5:30
शिरपूर : रब्बी हंगाम पूर्व सिंचन आढावा बैठकीत सहाय्यक अभियंता एस.एस.शिंदे
शिरपूर : तालुक्यातील सर्व लघु प्रकल्प १०० टक्के पाण्याने भरले असल्यामुळे यंदा रब्बी हंगाम चांगला घेता येऊ शकेल़ त्याकरीता लाभार्थी शेतकऱ्यांनी शासनाच्या पाण्याचा वापर करून सिंचन क्षेत्र वाढविण्यात यावे, असे प्रतिपादन येथील पाटबंधारे उपविभागाचे सहाय्यक अभियंता एस़एस़ शिंदे यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करतांना केले़
सन २०१९-२० ची रब्बी हंगामपूर्व सिंचन बैठक चाकूड येथे घेण्यात आली़ तालुक्यात यंदा सरासरीच्या दुपटीने पाऊस झाल्यामुळे सर्व लघु प्रकल्प १०० टक्के पाण्याने भरले आहेत़ या पार्श्वभूमिवर नांदर्डे, कालीकराड, रोहिणी, खामखेडा, लौकी, जळोद, विखरण, वाडी, बुडकी, मिटगांव, गधडदेव व वकवाड या प्रकल्पअंतर्गत असलेल्या लाभार्थी शेतकºयांना पूर्व सिंचनाची माहिती मिळावी याकरीता बैठकांचे आयोजन करण्यात आले होते.
पाटबंधारे उपविभागाचे सहाय्यक अभियंता एस़एस़ शिंदे म्हणाले, शासनाचा पाण्याचा दर अत्यल्प असल्याने तालुक्यात या संधीचा लाभ घेऊन सिंचन क्षेत्र वाढवावे़ तसेच विभागातील सिंचन वसुली देखील वाढवावी, असे सांगितले़ या प्रकल्पाच्या पाण्यामुळे शिरपूर तालुक्यात ६ ते ७ हजार एकर क्षेत्र ओलिताखाली येत असल्यामुळे गहू, हरभरा, दादर व इतर कडधान्यांना त्याचा लाभ होतो़
या बैठकीस शाखा अभियंता सी़पी़ धाकड, टी़आऱ दोरीक, भागवत पाटील, सुक्राम वेस्ता पावरा, सत्तारसिंग नारखा पावरा, पंडीत झुंझार पावरा, रूपजा भाया पावरा, आत्माराम पावरा, दिवाणसिंग पावरा, माधव आनंदा पाटील, अशोक आनंदसिंग राजपूत, सुकलाल किसन पावरा, देविदास पुंडलिक कोळी, हिरालाल चिंतामण तिरमले, मुरलीधर आत्माराम पाटील यांच्यासह लाभार्थी शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते़ यावेळी शेतकºयांच्या शंकाचे निरसन करण्यात आले.