शेतकरी विरोधी धोरणांच्या निषेधार्थ आज भारत बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2021 04:39 AM2021-09-27T04:39:16+5:302021-09-27T04:39:16+5:30
धुळे : शेतकरी विराेधी धोरणांच्या निषेधार्थ किसान मोर्चासह विविध शेतकरी, पक्ष-संघटनांनी सोमवारी बंदची हाक दिली असून बंद यशस्वी करण्याचे ...
धुळे : शेतकरी विराेधी धोरणांच्या निषेधार्थ किसान मोर्चासह विविध शेतकरी, पक्ष-संघटनांनी सोमवारी बंदची हाक दिली असून बंद यशस्वी करण्याचे आवाहन केले आहे. जिल्ह्यात ठिकठिकाणी आंदोलन होणार आहे. मोदी सरकार देशात हुकूमशाही आणण्याचे प्रयत्न करीत आहे. त्यांचा प्रयत्न हाणून पाडण्याची गरज आहे. केंद्रातील मोदी सरकारने देशातील शेतकऱ्यांना देशोधडीला लावले असून आता श्रमजिवी, कष्टकरी जनतेला रस्त्यावर आणण्याचे कारस्थान चालविले आहे. सरकारच्या या कृतीच्या विरोधात सोमवारी पुकारलेल्या बंदमध्ये जनतेने सहभागी व्हावे, असे आवाहन ज्येष्ठ नेते एम.जी. धिवरे यांनी केले. धुळे येथे पत्रकार संघाच्या कार्यालयात शनिवारी समविचारी पक्ष-संघटनांची बैठक झाली. केंद्र सरकारने तीन काळे कृषी कायदे करून शेतकऱ्यांना देशोधडीला लावले आहे. याविरुध्द देशभरातील शेतकरी दिल्लीच्या सीमांवर गेल्या १० महिन्यांपासून धरणे आंदोलन करीत आहेत. त्यांना पाठिंबा देण्यासाठी विविध शेतकरी संघटनांनी भारत बंदची हाक दिली आहे. बंद यशस्वी करण्याच्या नियोजनासाठी या बैठकीत चर्चा झाली.
यावेळी सत्यशोधक शेतकरी संघटनेचे नेते काॅ. किशोर ढमाले, पत्रकार हेमंत मदाने, काॅंंग्रेसचे उपाध्यक्ष मुकुंद कोळवले, इंटकचे अध्यक्ष प्रमोद सिसोदे, राष्ट्रवादी काॅंंग्रेसचे महानगर अध्यक्ष रणजित भाेसले, संविधान समितीचे हरिचंद्र लोंढे, प्रा. अनिल दामोदर, संजय अहिरे, काॅ. पोपटराव चाैधरी, हमाल मापाडी संघटनेचे गंगाधर कोळेकर, काॅ. वसंत चाैधरी, राहुल वाघ, श्रीकृष्ण बेडसे, कमलेश देवरे, काॅ. एल. आर. राव आदींनी बंद यशस्वी करण्याचे आवाहन केले.
यावेळी संविधान समितीचे प्रभाकर खंडारे, कामगार संघटनेचे एस. यू. तायडे, दलित मित्र बाबुराव नेरकर, रत्नशील सोनवणे, भागवत चितळकर, देवेंद्र पवार, रवींद्र पानपाटील, काॅ. एल. जे. गावीत, साक्री पंचायत समितीचे उप सभापती ॲड. नरेंद्र मराठे, काॅ. सुभाष काकुस्ते, मयूर देवरे, भालचंद्र सोनगत, दीपक देसले, बाळू सोनवणे, रतन सोनवणे, दीपकुमार साळवे आदी उपस्थित होते.
समाजवादी पार्टीचा पाठिंबा
दरम्यान, समाजवादी पार्टीने बंदला सक्रिय पाठिंबा दिला आहे. शहरातील पारोळा रोडवरील छत्रपती शिवाजी महाराज चाैकात सोमवारी सकाळी १० वाजता आंदोलन होणार आहे. आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन महानगर अध्यक्ष आसिफ मन्सुरी, कार्याध्यक्ष गोरख शर्मा, गुड्डू काकर, जमील मन्सूरी, अमीन पटेल, डाॅ. सरफराज अन्सारी, अकील अन्सारी, जाकीर खान नवाब खान, बबलू ठेकेदार, आसिफ पठाण, सुनील धात्रक, बिपिन गायकवाड, मनोहर निकुंभे आदींनी केले आहे.