इंदूरच्या तरुणाचा निजामपूरला बुडून मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 3, 2017 04:06 PM2017-06-03T16:06:03+5:302017-06-03T16:06:03+5:30
पाण्यात शुक्रवारी दुपारी आंघोळीसाठी गेलेल्या इंदूर येथील राजा विरेंद्र गोयल (19) या तरुणाचा बुडून मृत्यू झाला.
ऑनलाईन लोकमत
निजामपूर, जि. धुळे, दि. 3 - साक्री तालुक्यातील निजामपूरजवळ असलेल्या नकटय़ा बंधा:यातील पाण्यात शुक्रवारी दुपारी आंघोळीसाठी गेलेल्या इंदूर येथील राजा विरेंद्र गोयल (19) या तरुणाचा बुडून मृत्यू झाला.
शनिवारी सकाळी साडे दहा वाजता निजामपूर पोलीस व सहा जणांनी त्याचा मृतदेह बंधा:यातून बाहेर काढला. म्हसाई माता मंदिर परिसरात विवाह सोहळ्याचा कार्यक्रम होता. तेथे राजा गोयल हा तरुण कामासाठी आला होता. दुपारी तो नकटय़ा बंधा:यात आंघोळीसाठी गेला. तेव्हा ही दुर्घटना घडली.
सहाय्यक पोलीस निरीक्षक अजरुन पटेल, पोलीस निरीक्षक कैलास ढोले, पोलीस निरीक्षक कांतीलाल अहिरे, येथील स्थानिक मच्छिमार शैलेंद्र चव्हाण, मनोहर ठाकरे, राजेश माळचे, शामू सोनवणे, ग्रामपंचायत सदस्य सुनील बागले, जैताणे येथील गुलाब धनगर यांनी त्याचा मृतदेह बाहेर काढला. याबाबत विरेंद्र छगनलाल गोयल यांनी निजामपूर पोलीस स्टेशनला दिलेल्या माहितीवर अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.