औद्योगिक वसाहतीत व्यापा:याला लुटणारे पाच संशयित ताब्यात
By admin | Published: July 4, 2017 01:36 PM2017-07-04T13:36:57+5:302017-07-04T13:36:57+5:30
मोहाडी पोलिसांनी तपास कामाला वेग देत शिताफिने पाच संशयितांना मुद्देमालासह ताब्यात घेतल़े
Next
ऑनलाईन लोकमत
धुळे,दि.4 - शहरानजिक असलेल्या एमआयडीसीच्या प्रवेशद्वाराजवळ सोमवारी रात्री साडे दहा वाजेच्या सुमारास पत्र्याचे उत्पादन करणा:या व्यापा:यास लुटल्याची घटना घडली़ मोहाडी पोलिसांनी तपास कामाला वेग देत शिताफिने पाच संशयितांना मुद्देमालासह ताब्यात घेतल़े त्यातील एक संशयित पळून जाण्यात यशस्वी ठरला़
मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील एमआयडीसी (औद्योगिक विकास महामंडळ) यामध्ये पत्र्याची निर्मिती करण्याचा व्यवसाय करणारे व्यापारी दीपक मंदान हे आपला दैनंदिन व्यवहार आटोपून घरी जात असताना त्यांना एमआयडीसीच्या प्रवेशद्वाराजवळ टोळीने अडविले आणि त्यांच्याजवळील 1 लाख 30 हजार रुपये घेवून चोरटे पळून जाण्यात यशस्वी ठरले होत़े या घटनेची माहिती मोहाडी पोलिसांना मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाल़े त्यांनी तपास कामाला सुरुवात केली आणि रात्रीतून या प्रकरणाचा छडा लावला़ 1 लाख 30 हजारामधून 1 लाख 16 हजार 600 रुपये, हत्यार आणि दुचाकी मोहाडी पोलिसांनी ताब्यात घेतले आह़े याप्रकरणी मोहाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आह़े