नदी किनारी स्त्री जातीचे जीवंत अर्भक सापडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 1, 2019 11:08 AM2019-07-01T11:08:40+5:302019-07-01T11:09:28+5:30
शिंदखेडा तालुक्याती घटना : प्रशासनासह नागरिकांच्या सहकार्यांना वाचले प्राण
लोकमत न्यूज नेटवर्क
ंिशंदखेडा : तालुक्यतील वर्षी गावालगत असलेल्या सुर नदीच्या पुलाखाली नुकतेच जन्मलेले स्त्री जातीचे अर्भक अज्ञात व्यक्तीने फेकून दिले होते़ पोलिसांनी घटनास्थळी जावुन अर्भकावर उपचार दाखल केल्याने या अर्भकाचा जीव वाचला आहे़
तालुक्यातील वर्षी गावालगत असलेल्या सुर नदीच्या पुलाखाली रविवारी सकाळी नऊ वाजेच्या सुमारास शेतात काम करणाºया मजुरांना लहान बाळाचा रडण्याचा आवाज आला. आवाजाचा शोध घेत मजूर त्या ठिकाणी गेल्यावर एका गोणपाटात लहान मुल असल्याचे आढळले. मजुरांनी ही घटना दिनेश पाटील, नरेंद्र राजपूत यांच्या लक्षात आणून दिली़ त्यांनी तत्काळ गोणपाटात बंद अर्भकाला काढून बाहेर काढले़ स्त्री जातीचे अर्भक नुकतेच जन्मल्याने ते रक्ताने व राखेने माखलेले होते.
याबाबत टेमलाय येथील पोलीस पाटील किरणसिंग राजपूत यांच्याशी संपर्क साधून माहिती दिली. शिंदखेडा पोलीसांना अर्भक सापडल्याचे माहिती देण्यात आल्याने घटनास्थळी तत्काळ पोलीस उपनिरीक्षक एम. सैय्यद, पो कॉ़ बिपीन पाटील यांनी पाहणी केली़ शिंदखेडा ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी अर्भकाला हलविण्यात आले़ रुग्णालयामध्ये वैद्यकीय अधिकारी डॉ. भूषण काटे, डॉ सद्दाम खान यांनी परिचारिका शितल शिंदे, संतोष राजभोज, चंद्रशेखर चौधरी यांच्या मदतीने उपचार केले जात आहे़
सदरील अर्भकाची प्रकृतीस्थिर असून पुढील उपचारासाठी शहरातील भाऊसाहेब हिरे महाविद्यालयात पाठविण्यात आले असुन सदरील अर्भकाचे प्राण वाचविल्याने वैद्यकीय अधिकारी काटे यांनी सहकार्य केले़ पुढील तपास केला जात आहे़