धुळे शहरातील साक्रीरोडवरील अतिक्रमण हटविण्यास सुरूवात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2018 10:04 AM2018-02-21T10:04:59+5:302018-02-21T10:06:07+5:30
पोलीस बंदोबस्त तैनात, सहा जेसीबींच्या सहायाने कारवाई
लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : शहरातील साक्रीरोडवरील अतिक्रमण हटविण्यास सार्वजनिक बांधकाम विभागाने बुधवारी सकाळी ८ वाजेपासून सुरूवात केली़ सहा जेसीबींसह ट्रॅक्टर, ट्राली, के्रनच्या आधाराने अतिक्रमण काढण्यास सुरूवात झाली़ यावेळी बघ्यांची मोठी गर्दी झाली होती़
शहरातील साक्रीरोडच्या रूंदीकरणाचे काम सार्वजनिक बांधकाम विभागाने हाती घेतले आहे़ त्यापार्श्वभूमीवर मोती नाला ते जुन्या टोलनाक्यापर्यंत ३ किलोमीटर रस्त्यावरील अतिक्रमण हटविण्यास बांधकाम विभागाने बुधवारी सुरूवात केली़ सार्वजनिक बांधकाम विभाग व शहर पोलीसांच्या बंदोबस्तात सुरू झालेल्या कारवाई शांततेत दुकानांसमोरील ओटे, टपºया, शेड, पत्रे, बांधकामे जेसीबीव्दारे हटविण्यात आली़ यावेळी अग्निशमन विभागाचा बंबही तैनात होता़ या कारवाईच्या पार्श्वभूमीवर वीजपुरवठा खंडीत करण्यात आला असून महावितरणचे कर्मचारी देखील उपस्थित असल्याचे दिसून आले़ या कारवाईवेळी बघ्यांची वारंवार गर्दी होत होती, शिवाय वाहतुकीचाही खोळंबा होत होता़ परंतु वाहतूक पोलीसांनी रस्त्यावरील वर्दळ सुरळीत राखण्यास मदत केली़