जखमींवर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू

By admin | Published: March 13, 2017 01:09 AM2017-03-13T01:09:50+5:302017-03-13T01:09:50+5:30

मोहाडीतील दगडफेक, हाणामारी प्रकरण : सहाजण जखमी

The injured started treatment at a private hospital | जखमींवर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू

जखमींवर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू

Next

धुळे : शहरातील मोहाडी शिवारात शनिवारी सायंकाळी शिंदे व गावडे गटात दगडफेक व हाणामारी झाली होती़ त्यात सहा जण जखमी झाले होत़े याप्रकरणी परस्परविरोधी तक्रारीवरून 36 जणांविरुद्ध मोहाडी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आह़े जखमींवर शहरातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत़
याबाबत विनायक वालचंद शिंदे (वय 69, रा़ मोहाडी उपनगर) यांनी पोलिसात दिलेल्या फिर्यादीनुसार, 11 मार्च रोजी दुपारी 4़30 वाजेच्या सुमारास गावातील महादेव मंदिरात दर्शन करून बाहेर आल्यावर विक्की उर्फ विकास गावडे, सुनील गावडे, संदीप गावडे, राहुल विठ्ठल गावडे, पप्पू ज्ञानेश्वर गावडे, नाना गावडे, बावन पिंटय़ा, विठ्ठल गावडे व त्याच्या सोबत असलेले इतर इसम (सर्व रा़ मोहाडी उपनगर) यांनी आंधळ्या तू राजकारण करतो, असे म्हणून हातातील लोखंडी रॉडने विनायक शिंदे यांच्या डोक्यावर जीवे मारण्याच्या उद्देशाने मारल़े त्या वेळी भांडण सोडविण्यासाठी आलेले राजेंद्र शिंदे यांनाही मारहाण केली़ त्यात दोघे जखमी झाल़े तसेच  विनायक शिंदे यांच्या खिशातील 2 हजार रुपये जबरीने काढून घेतल़े परत जाताना शिंदे गटास मदत करणारे सूर्यभान संभाजी पाटील, छायाबाई सूर्यभान पाटील यांनाही जखमी केल़े  तसेच योगेश भास्कर पाटील यांच्या घराचे व देवगावकर यांच्या मालकीच्या दुचाकी वाहनाचेही नुकसान केल़े या वेळी लोखंडी रॉड, लाकडी दांडके व दगडाचांही वापर करण्यात आल्याचे फिर्यादीत म्हटले आह़े जखमी झाल्याने राजू शिंदे व विनायक शिंदे यांना उपचारार्थ शहरातील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आह़े
याप्रकरणी वरील आठ व त्यांच्या इतर साथीदारांविरुद्ध भादंवि कलम 307, 395, 143, 147, 148, 149, 324, 326, 336, 337, 342, 427, 323, 504, 506 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आह़े
परस्परविरोधात सुनील भानुदास गावडे (वय 22, रा़ जयशंकर कॉलनी, मोहाडी उपनगर) याने पोलिसात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, 11 मार्च रोजी सायंकाळी 5़30 वाजेच्या सुमारास गावातील श्रीराम रिक्षा थांब्याजवळील सायकल मार्टच्या दुकानासमोर साथीदारांसह गप्पा मारत असताना रेल्वे गेटकडून राजेंद्र शिंदे याच्यासह 28 जण जिप्सी (क्ऱ 555) व जीप (क्ऱ एमएच 18/369)सह दुचाकीवर आल़े
तुम्ही जास्त मातून गेले आहेत, तुम्हाला गावात राहू देणार नाही, असे बोलून शिवीगाळ करून हातातील लोखंडी रॉड, बेसबॉलचे दांडके व धारदार हत्याराने सुनील गावडेसह विक्की गावडे, प्रदीप रमेश  गावडे, भूषण ज्ञानेश्वर पाटील यांना मारहाण करून जीवे मारण्याचा प्रयत्न केला़ त्यात चौघे जखमी झाले आहेत़ त्यांना उपचारार्थ शहरातील खासगी रुग्णालय व हिरे वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले आह़े
याप्रकरणी राजेंद्र वालचंद शिंदे, किशोर पाटील, वाल्मीक पाटील, श्याम पाटील, सुरेश नारायण पाटील, अभिजित पाटील, मुन्ना (पूर्ण नाव-गाव माहीत नाही), विनायक वालचंद शिंदे, जीवन देवीदास पाटील, अशोक नारायण पाटील, भूषण सुरेश पाटील, चेतन अशोक पाटील, बाळा रवींद्र पाटील, आकाश विनायक शिंदे, दादू सूर्यभान ठाकूर, बंटी सूर्यभान ठाकरे, सागर आनंदा पाटील, ज्ञानेश्वर भगवान पाटील, योगेश भास्कर पाटील, किशोर पाटील, भटू पाटील, राकेश रमेश भामरे, सोन्या सुरेश शिंदे, रवींद्र नारायण शिंदे, काळ्या उर्फ प्रदीप शिंदे, शेखर विनायक शिंदे, सागर बंडू पाटील, सखाराम भगवान पाटील, विजय रामचंद्र अहिरे (सर्व रा़ मोहाडी उपनगर) यांच्याविरुद्ध मोहाडी उपनगर पोलीस ठाण्यात भादंवि कलम 307,  143, 147, 148, 149, 504, 506 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आह़े तपास सहायक पोलीस निरीक्षक जयंत शिरसाठ करीत आहेत़
संशयितांचा शोध सुरूच
4शनिवारी सायंकाळी दोन्ही गटात हाणामारी झाली़ त्यात लोखंडी रॉड, बेसबॉलचा दांडा, लाकडी दांडके, काठय़ा, दगड व धारदार हत्यारांचा वापर करण्यात आला़ त्यात सहा जखमी झाल़े संशयितांचा शोध सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितल़े

Web Title: The injured started treatment at a private hospital

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.