आधुनिक बुध्दीबळात शंभराचा नाविन्यपूर्णशोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 3, 2019 10:07 PM2019-08-03T22:07:58+5:302019-08-03T22:08:25+5:30

बाळकृष्ण तांबे । धुळ्याच्या सुपुत्राचे संशोधन

Innovative Discovery of the Century in Modern Wisdom | आधुनिक बुध्दीबळात शंभराचा नाविन्यपूर्णशोध

आधुनिक बुध्दीबळात शंभराचा नाविन्यपूर्णशोध

Next

संडे हटके बातमी -
वसंत कुलकर्णी । 
लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे :   बुद्धिबळ या खेळाचा उगम भारतात झाला असून आज आंतरराष्ट्रीय पातळीवर मोठा चाहता वर्ग आहे. जगातील प्रसिद्ध खेळांपैकी एक खेळ म्हणून बुद्धिबळाची ओळख आहे. बुद्धीला चालना देणाºया खेळाला आधुनिकतेची जोड देत एक नवा आविष्कार म्हणून आधुनिक बुद्धिबळ १०० चे  संशोधन मूळचे धुळ्याचे प्रा.बाळकृष्ण तांबे यांनी केले आहे.
व्यवसायाने अभियंता बाळकृष्ण तांबे यांनी पुणे येथे नौकरी करत असताना मुलाला बुद्धिबळ शिकवायला सुरवात केली. तेव्हा पारंपरिक खेळात त्यांना त्रुटी जाणवल्या. आणि जास्तीस्त जास्त रंजक व खेळाचा निकाल लागेल या दृष्टीने  १० ते १५ वर्ष विविध अंगाने संशोधनाला सुरवात करत आधुनिक बुद्धिबळ १०० ची निर्मिती झाली. पारंपरिक बुद्धी बळात ६४ घरे आणि ३२ सोंगट्या असल्याने चाली रचताना ३२ घरांचा वापर पुरेसा वाटला नाही़ म्हणून आधुनिक बुद्धीबळात १०० घरे आणि ४० सोंगट्या वापरल्या जात असल्याने खेळ अधिक आकर्षक, रंजक, गतिमान आणि आव्हानात्मक करण्यासाठी गणितातील दशमान पद्धतीचा वापर त्यांनी केला आहे. आधुनिक बुद्धिबळ १०० ही पुस्तिका लिहिली आहे. यात आधुनिक बुद्धिबळाच्या माध्यमातून खेळातील बदल नव्या खेळाची रचना नियम, मोहºयांची नावे या विषयी माहिती पुस्तिकेत देण्यात आली आहे. या बुद्धीबळ संपदेचे हक्क केंद्र सरकारकडे नोंदणीकृत असून एकंदरीत या खेळातील संशोधन बुद्धीला चालना देण्यासाठी एक उत्तम माध्यम म्हणून येणाºया काळात आधुनिक बुद्धिबळाच्या रुपात खेळले जाईल, असे मत त्यांनी ‘लोकमत’शी  संवाद साधताना मांडले. बुद्धिबळात काल्पनिक पध्दतीने युद्ध खेळले जात.े काळानुरूप नियमात बदल होत जाऊन संगणकामध्ये प्रोग्रामिंग करून बुद्धीबळ खेळले जाऊ लागले असले तरी त्यात हवी ती गतिमानता नसल्याने तरूण पिढी व्हिडियो गेम्सकडे जेवढी आकर्षीत होतात, तेवढी बुद्धिबळ खेळण्यासाठी आकर्षीत होत नाहीत . आधुनिक बुद्धिबळ १०० खेळण्यासाठी अधिक वेगवान असल्याने  बौद्धिक एकाग्रता स्मरणशक्ती सुधारणेसोबत सर्जनशील माध्यम म्हणून उपयुक्त आहे़
आधुनिक काळानुसार सुसंगत बदल करत राजेशाही संपुष्टात आल्या नंतर सध्याच्या लोकशाही रूढ झाली असून त्या नुसार सोंगट्यांची रचना व नावे देण्यात आली आहेत. ज्यात  अध्यक्ष, सेनापती, सैनिक कमांडो, रणगाडा, तोफ, बाँम्बर, अशी नावे दिली आहेत. आधुनिक बुद्धिबळात दुहेरी पद्धतीने खेळणे ही शक्य आहे. मोरोपंत तांबे यांच्या कन्या झाशीच्या राणी लक्ष्मीबाई घराण्यातील प्रा़बाळकृष्ण तांबे हे वंशज आहेत़

Web Title: Innovative Discovery of the Century in Modern Wisdom

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Dhuleधुळे