दोंडाईचा येथील बालिका अत्याचार प्रकरणाची चौकशी करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2018 05:25 PM2018-02-23T17:25:04+5:302018-02-23T17:26:11+5:30

मागणी : मुलायमसिंग युथ ब्रिगेड समाजवादी पार्टीतर्फे निदर्शने

Inquire about the girl child abuse case of Dondaicha | दोंडाईचा येथील बालिका अत्याचार प्रकरणाची चौकशी करा

दोंडाईचा येथील बालिका अत्याचार प्रकरणाची चौकशी करा

Next
ठळक मुद्देतसेच संबंधित बालिकेच्या माता-पित्यांवर राजकीय दबावही वापरण्यात येत आहे. त्यामुळे या प्रकरणाची सखोल चौकशी करून पडद्यामागील जो कोणी राजकीय नेता किंवा व्यक्ती असेल, त्याला त्वरित अटक करावी, अशी मागणी निवेदनात नमूद करण्यात आली आहे. याप्रकरणी दोषींना त्वरित अटक न केल्यसा रस्त्यावर येऊन मोर्चा व धरणे आंदोलन करणार असल्याचा इशारा मुलायमसिंग युथ ब्रिगेड समाजवादी पार्टीने दिला आहे.शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयात निदर्शने करताना सीमा चव्हाण, नजमा इस्माइल शहा, पूजा चव्हाण, ज्योती चव्हाण, जरिना काझी, गोरख शर्मा, अश्पाक मिर्झा, इनाम सिद्धीकी, जमील मन्सुरी, गुलाम कुरेशी, जाकीर खान, नवाबखान, राजकुमार व्यास, प्रशांत शर्मा आदी उपस्थित ह

लोकमत न्यूज नेटवर्क 


धुळे :  दोंडाईचा येथील नूतन विद्यालयात शिकणाºया पाच वर्षीय बालिकेवर झालेल्या अत्याचार प्रकरणाची चौकशी करावी. तसेच संबंधित बालिकेच्या माता-पित्यांवर दबाव टाकणाºयांना तत्काळ अटक करावी, या मागणीसाठी  मुलायमसिंग युुथ ब्रिगेड समाजवादी पार्टीतर्फे शुक्रवारी  जिल्हाधिकारी कार्यालयात निदर्शने करण्यात आली. 
यासंदर्भात जिल्हा प्रशासनाला दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, की सरकारतर्फे ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ अभियान राबविण्यात येत आहे. त्यात जिल्ह्यात मुलींवर अत्याचार होण्याचे प्रकार राजरोसपणे सुरू आहेत. त्याला पायबंद घालणे गरजेचे आहे. कायद्याची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याचे काम सरकारचे आहे. दोंडाईचा येथील बालिका अत्याचार प्रकरणी तो नराधम जेवढा जबाबदार आहे. त्यासोबत हे प्रकरण दाबणे किंवा उघडकीस येऊ नये, म्हणून काही राजकीय नेतेमंडळी प्रयत्न करीत आहे.

Web Title: Inquire about the girl child abuse case of Dondaicha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.