नगरोत्थानच्या कामांची महापौरांकडून पाहणी!

By admin | Published: February 2, 2017 12:52 AM2017-02-02T00:52:20+5:302017-02-02T00:52:20+5:30

धुळे : शहरात सद्य:स्थितीत मनपातर्फे महाराष्ट्र सुवर्णजयंती राज्यस्तरीय नगरोत्थान योजनेंतर्गत सुरू असलेल्या कामांची पाहणी बुधवारी महापौर कल्पना महाले यांनी केली़

Inspector of the works of Nagorothan's mayor! | नगरोत्थानच्या कामांची महापौरांकडून पाहणी!

नगरोत्थानच्या कामांची महापौरांकडून पाहणी!

Next

धुळे : शहरात सद्य:स्थितीत मनपातर्फे महाराष्ट्र सुवर्णजयंती राज्यस्तरीय नगरोत्थान योजनेंतर्गत सुरू असलेल्या कामांची पाहणी बुधवारी महापौर कल्पना महाले यांनी केली़
शहरात 43 कोटी रुपयांची 16 रस्त्यांची कामे राज्य नगरोत्थान योजनेंतर्गत सुरू करण्यात आली आह़े सदर कामांचा दर्जा व गुणवत्ता कायम राहावी यासाठी महापौर कल्पना महाले यांनी साक्री रोड ते डायव्हर्शन रोड व बाहुबलीनगरमध्ये सुरू असलेल्या रस्ता कामांची पाहणी केली़ गटारीमधून जलवाहिनी जात असल्याचे काही ठिकाणी दिसून आले, तसेच काही ठिकाणी रस्त्यांची रुंदी व गटारी एका रेषेत नसल्याचे आढळून आल़े याबाबत संबंधित ठेकेदार व अधिका:यांना जलवाहिनी गटारींच्या खालून घेऊन त्यास आवश्यक ते आवरण योग्य प्रकारे देण्याबाबत आदेशित करण्यात आल़े तसेच ले-आऊटनुसार रस्त्यांची रुंदी तपासून त्यानुसार कामे करण्याबाबत सूचित करण्यात आल़े कामांचा दर्जा व गुणवत्तेची पाहणी त्रयस्थ तज्ज्ञ समितीमार्फत करवून घेतली जाणार आह़े
या पाहणीनंतरच व त्यांच्या अहवालानुसार संबंधित कामांची मोजमाप पुस्तिकेत नोंद करणे व त्यानंतर कामांची देयके अदा करणेबाबत संबंधितांना आदेशित करण्यात आल़े
या वेळी सभागृह नेते कमलेश देवरे, स्थायी समिती सभापती कैलास चौधरी, महिला बालकल्याण सभापती इंदू वाघ, सहायक आयुक्त त्र्यंबक कांबळे, शहर अभियंता कैलास शिंदे, ओव्हरसिअर चंद्रकांत उगले यांच्यासह ठेकेदार व अधिकारी उपस्थित होत़े

Web Title: Inspector of the works of Nagorothan's mayor!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.