रुग्ण व नातेवाईकांशी साधला संवाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2019 12:03 PM2019-02-17T12:03:41+5:302019-02-17T12:04:24+5:30
आयुष्यमान भारत योजना : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली विचारपूस
धुळे - जळगाव व धुळे जिल्ह्यातील आयुष्यमान भारत योजनेचा लाभ घेणाऱ्या रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यासपीठामागील बाजुस तयार केलेल्या हॉलमध्ये संवाद साधला.
जिल्ह्यात महात्मा फुले जीवनदायी आरोग्य योजना, आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जनआरोग्य योजना कल्याणकारी ठरत आहे. गेल्या ६ वर्षांत या योजनेतून धुळे जिल्ह्यातील तब्बल ६९ हजार ७०४ रुग्णांनी या योजनेतून उपचार घेतले आहेत़ यासाठी शासनाकडून १५२ कोटीं ८ लाख ६२५ रूपयांचे अर्थसाहाय्य देण्यात आले आहे. दरम्यान जिल्ह्यातील ११ रुग्णालयांमध्ये या योजनेअंतर्गत उपचार केले जात आहेत.
महात्मा फुले योजनेअंतर्गत वर्षार्ला प्रति कुटुंब दीड लाख तर प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेमध्ये वषार्ला प्रति कुटुंब ५ लाख रुपयांचे उपचार केले जातात.
आयुष्यमान प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेत १ लाख २० हजार ४८९ कुटुंबे ग्रामीण भागातील तर २० हजार ६२० शहरी भागातील आहेत.