२५० उपवर-वधूंनी दिला परिचय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 5, 2019 10:28 PM2019-03-05T22:28:00+5:302019-03-05T22:28:20+5:30
साक्री : खान्देशातून मराठा समाजातील नागरीकांची होती उपस्थिती
लोकमत न्यूज नेटवर्क
साक्री : साक्री तालुका मराठा समाज उन्नती मंडळ व मराठा शुभ लग्न डॉट कॉम यांच्या संयुक्त विद्यमाने साक्री येथील बालआनंद नगरीत तालुक्यात प्रथमच मराठा वधु-वर व पालक परिचय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते़ सदर मेळाव्यात २५० युवक-युवती व त्यांच्या पालकांनी आपला परिचय करून दिला.
मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी साक्री तालुका एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष पराग बेडसे होते़ माजी प्राचार्य बी़ एस़ पाटील, जिल्हा परिषदेचे सदस्य विलास बिरारीस, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती पोपटराव सोनवणे, मराठा समाज उन्नती मंडळ पिंपळनेरचे सुरेंद्र मराठे, डी. पी. पाटील, आर. एस. कदम, संस्थेचे सेक्रेटरी गजेंद्र भोसले, उत्तमराव वंजी देवरे, शुभलग्न डॉट कॉम चे संचालक हेमंत पगार, नगरसेवक शरद भामरे, पुनम शिंदे, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष जितेंद्र मराठे, भाजपाचे तालुकाध्यक्ष संजय अहिरराव, जयवंतराव ठाकरे, उत्पल नांद्रे, भैय्यासाहेब सोनवणे, संजू पाटील, दीपक अहिरराव आदी मान्यवर उपस्थित होते.
तालुक्यात प्रथमच एवढ्या मोठ्या प्रमाणावर या वधू-वर परिचय मेळाव्यास प्रतिसाद मिळाला़ त्यामुळे मराठा समाजातील कार्यकर्त्यांचे मनोबल वाढले असे मान्यवरांनी यावेळी गौरवोद्गार काढले. आर्थिक परिस्थिती नसलेल्या पालकांना यात सवलत देत त्यांच्यासाठी मोफत नोंदणी करण्यात आली. नाशिक येथील शुभलग्न डॉट कॉम संचालक हेमंत पगार यांनी सर्वच युवक-युवतींचा परिचय करून दिला. मेळाव्यास साक्री तालुका एज्युकेशन सोसायटी, मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड, जिजाऊ ब्रिगेड, पाटील परीवार व तालुक्यातील समस्त मराठा समाजाचे सहकार्य लाभले. यावेळी बी. एम.भामरे, दिलीप काकुस्ते व बी.एस.पाटील यांनी मार्गदर्शन केले.
मेळावा यशस्वीतेसाठी अनिल अहिरे, मराठा सेवा संघाचे तालुकाध्यक्ष प्रवीण मोरे, जिजाऊ ब्रिगेडच्या अध्यक्षा मीना काकुस्ते, संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष जयेश सोनवणे, सचिव जितेंद्र अहिरराव, पाटील परिवाराचे शीतल पाटील, राकेश पाटील तसेच सुहास सोनवणे, शालिक बच्छाव, प्रा कांतीलाल सोनवणे, प्रशांत देवरे, डॉ सचिन नांद्रे, ए. बी. मराठे, दगाजी देवरे, किरण नांद्रे, गिरीश रामोळे, डॉ. राजेंद्र अहिरे आदींनी सहकार्य केले. सूत्रसंचालन पी. झेड. कुवर यांनी केले तर प्रास्ताविक विजय भोसले यांनी केले. आभार डॉ. विपीन पवार यांनी मानले.
मेळाव्यासाठी नाव नोंदणी झालेल्यांची संख्या मेळाव्याच्या आदल्या दिवसापर्यंत केवळ ६० होती़ परंतु, मेळाव्याप्रसंगी धुळे, अमळनेर, चोपडा, सुरत अशा विविध ठिकाणाहून मराठा समाज उपस्थित राहिल्याने नोंदणी २५० पर्यंत झाली. याबद्दल पदाधिकाºयांनी समाधान व्यक्त केले़