धुळे जिल्ह्यात ‘लम्पी’चा शिरकाव, ४० गुरे बाधित

By अतुल जोशी | Published: August 18, 2023 05:54 PM2023-08-18T17:54:39+5:302023-08-18T17:54:55+5:30

लम्पीचा प्रादुर्भाव जनावरांना विलगीकरणात ठेवण्यात आलेले आहे. द

Intrusion of 'lumpi' in Dhule district, 40 cattle affected | धुळे जिल्ह्यात ‘लम्पी’चा शिरकाव, ४० गुरे बाधित

धुळे जिल्ह्यात ‘लम्पी’चा शिरकाव, ४० गुरे बाधित

googlenewsNext

धुळे  :   गेल्यावर्षी जिल्ह्यात लम्पीचा प्रादुर्भावामुळे अनेक जनावरे दगावली होती. मात्र पशुसंवर्धन विभागाने वेळीच केलेल्या लसीकरणामुळे हा संसर्गजन्य आजार आटोक्यात आला होता. मात्र आता जिल्ह्यात पुन्हा लम्पीचा शिरकाव झालेला असून, आतापर्यंत ४० जनावरांना ‘लम्पी’ची लक्षणे आढळून आलेली आहे. 

लम्पीचा प्रादुर्भाव जनावरांना विलगीकरणात ठेवण्यात आलेले आहे. दरम्यान या संसर्गजन्य आजाराचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून जिल्ह्यात लसीकरण सुरू करण्यात आल्याची माहिती पशसंवर्धन विभागाकडून देण्यात आली.

आतापर्यंत जिल्ह्यात ४० जनावरांना लम्पीचा प्रादुर्भाव झाल्याचे निदर्शनास आलेले असून, त्यात सर्वाधिक जनावरे धुळे तालुक्यातील आहे. धुळ्यात २२, तर साक्री,शिरपूर तालुक्यात प्रत्येक आठ व शिंदखेडा तालुक्यात अवघ्या दोन जनावरांना हा आजार झाल्याचे निदर्शनास आलेले आहे.मात्र लम्पीची तीव्रता पूर्वी प्रमाणे नाही.
 

Web Title: Intrusion of 'lumpi' in Dhule district, 40 cattle affected

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Dhuleधुळे