धुळे शहरात भर उन्हाळ्यात पाण्याची नासाडी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 2, 2018 11:43 AM2018-04-02T11:43:48+5:302018-04-02T11:43:48+5:30

रोज हजारो लीटर पाणी वाया : अनारोग्य फैलण्याचाही धोका; महापालिकेची यंत्रणा मात्र सुस्त

Inundation of water throughout the summer of Dhule | धुळे शहरात भर उन्हाळ्यात पाण्याची नासाडी 

धुळे शहरात भर उन्हाळ्यात पाण्याची नासाडी 

Next
ठळक मुद्देदुस-या सांगे ब्रह्मज्ञान..मनपाच्या कारभाराची स्थिती पाणी मिळत नसताना ते वाया जात असल्याने नागरिकांमध्ये रोषगळत्या शोधून त्यांची दुरुस्ती करणार, उपायुक्तांची माहिती  


लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : शहराला पाणीपुरवठा करणा-या  पाईपलाईनला जागोजागी लागलेल्या गळत्यांमुळे रोजी हजारो लीटर पाणी अक्षरश: वाया जात असून भर उन्हाळ्यात सुद्धा ही परिस्थिती कायम आहे. एकीकडे शहरातील बहुतांश भागांना नियोजन नसल्याने सहा दिवसाआड पाणी मिळत आहे. तर दुसरीकडे हजारो लीटर स्वच्छ पाणी वाहून वाया जात आहे. भरीस भर म्हणजे या गळत्यांमुळे  नागरिकांच्या आरोग्य धोक्यात आले आहे. 
‘दुस-या सांगे ब्रह्मज्ञान...
डेंग्यूचे डास निर्माण होतील म्हणून मनपा नागरिकांना आठवड्यातून एकदा पाण्याचे साठे उपसण्यास सांगते, भांडे घासून स्वच्छ करण्यास सांगते. मात्र शहरात अनेक ठिकाणी गळतीमुळे वाया जाणाºया पाण्यात डासांची निर्मिती होत असल्याने अनारोग्य फैलण्याची दाट शक्यता आहे. या मुळे महापालिकेची स्थिती ‘दुस-या सांगे ब्रह्मज्ञान, स्वत: कोरडे पाषाण’ अशी झाली आहे. 
साक्रीरोडवर पं.नेहरू उद्यानाजवळ, जवाहर नगर, सिंहस्थ नगर, हनुमान टेकडी जलशुद्धीकरण, संतोषीमाता मंदिर चौक, दत्तमंदिर चौक, पारोळा रोड, वडजाई रोड, जमनागिरी रस्ता अशा विविध भागांत गळत्यांद्वारे पाणी वाया जात असून मनपा यंत्रणेस त्याचे काही सोयरसुतक उरलेले दिसत नाही. या मुळे नागरिकांमध्ये रोष व्यक्त होत आहे. 
साक्रीरोडवरील मोठ्या गळतीकडेही अद्याप दुर्लक्ष 
शहरातील साक्रीरोडवर पंडित जवाहरलाल उद्यानालगत लागलेल्या गळतीतून रोज हजारो लीटर स्वच्छ पाणी नजीकच्या गटारातून वाहत वाया जात आहे.या गळतीबाबतही स्थानिक नागरिकांनी मनपाला कळविले, तक्रारी केल्या. परंतु गेल्या अनेक महिन्यांपासून या गळतीची दुरुस्ती झालेली नाही. अद्याप या गळतीतून पाणी वाहून वाया जात आहे. भर उन्हाळ्यातही पाण्याचे मोल न समजणा-या मनपाच्या कारभाराबद्दल नागरिकांमध्ये तीव्र रोष व्यक्त होत आहे. 
शहरातील साक्रीरोडवर असलेल्या जवाहर नगरात गळतीमुळे गटारातून वाहणाºया स्वच्छ पाण्यात मोठ्या संख्येने डेंग्यूच्या डासाच्या अळ्या दिसून आल्या. मोठ्या वस्तीतून ही गटार वाहते. परंतु मनपा आरोग्य विभागास इकडे पाहण्यास वेळ नाही. नागरिकांना विचारणा केली असता त्यांनी याबाबत यापूर्वीच मनपाला कळविल्याचे सांगितले.
मनपा गळत्या शोधून दुरूस्ती करणार 
मार्चअखेर वसुलीचे काम  संपल्याने कर्मचाºयांची पथके तयार करण्यात येणार आहेत. या पथकातील कर्मचारी  शहराच्या विविध भागात गळत्या शोधून त्यांची दुरुस्ती करण्यात येईल, अशी माहिती महापालिकेचे उपायुक्त रवींद्र जाधव यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.  


 

Web Title: Inundation of water throughout the summer of Dhule

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.