धुळे जिल्ह्यातील खाजगी प्रवासी वाहनांची तपासणी करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2019 11:33 AM2019-06-27T11:33:40+5:302019-06-27T11:34:27+5:30
जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश : ग्राहक समितीची बैठक
आॅनलाइन लोकमत
धुळे : जिल्ह्यात खासगी प्रवासी वाहतूक करणाºया वाहनांची पोलिस आणि प्रादेशिक परिवहन विभागाने संयुक्तपणे तपासणी मोहीम राबवावी, असे आदेश जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी दिले आहेत.
जिल्हाधिकारी कार्यालयातील सातपुडा सभागृहात जिल्हा ग्राहक दक्षता व ग्राहक संरक्षण समितीच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी बाजार समितीचे सभापती सुभाष देवरे, प्रादेशिक परिवहन अधिकारी तडवी, अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहाय्यक आयुक्त एल.आर. दराडे, जिल्हा पुरवठा अधिकारी महेश चौधरी यांच्यासह ग्राहक संरक्षण परिषदेचे सदस्य उपस्थित होते.
धुळे जिल्ह्यात स्वस्त धान्य दुकानाच्या माध्यमातून आता पॉस मशीनद्वारेच धान्य वितरण करण्यात येत आहे. अशा परिस्थितीत ग्रामस्तरावर ग्राहकांच्या काही समस्या असतील, तर समितीच्या अशासकीय सदस्यांनी त्या निदर्शनास आणून द्याव्यात. आॅक्सीटोसीन ड्रग्ज बाबत अन्न व औषध प्रशासनाने नियमीत तपासणी करून दोषींवर कारवाई करताना संबंधितांचा परवाना निलंबनासह एफ.आय.आर.दाखल करावा. प्लास्टिक पिशव्या बंदीबाबत महापालिकेसह प्रशासनाने संयुक्तपणे कारवाई करून मोहिम राबविण्याबाबत निर्देश दिले. स्वस्त धान्य दुकानदार धान्यासाठी जादा पैशांची मागणी करीत असेल अथवा शैक्षणिक दाखल्यांसाठी कोणी पैशांची मागणी करीत असल्यास तक्रार करावी अन्यथा लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल करावी. यावेळी डॉ. योगेश सूर्यवंशी, मंजुळा गावित, रतनचंद शहा, आलोक रघुवंशी, प्रतिभा चौधरी उपस्थित होते.