पांझरेच्या पुरात वाहून आला इसमाचा मृतदेह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2020 10:46 PM2020-08-21T22:46:19+5:302020-08-21T22:46:42+5:30

देवपुरातील घटना : मयत हा धुळे तालुक्यातील मोराण्याचा

Isma's body was swept away in the floodwaters | पांझरेच्या पुरात वाहून आला इसमाचा मृतदेह

पांझरेच्या पुरात वाहून आला इसमाचा मृतदेह

Next

धुळे : शहराच्या मध्य भागातून वाहत असलेल्या पांझरा नदी पात्रात शुक्रवारी सकाळी इसमाचा मृतदेह आढळून आला़ पोलिसांना घटनेची माहिती कळताच पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले होते़ हिरामण रामभाऊ चव्हाण (५०, रा़ मोराण ता़ धुळे) असे त्यांचे नाव आहे़
देवपुरातील वीर सावरकर पुतळा ते मोठा पुल दरम्यान, पांझरा नदीच्या मध्यभागी पाण्यातून एका इसमाचा मृतदेह वाहून जात असल्याचे पाहून मासेमारी करणाऱ्या तरुणांनी त्याला ओढून किनाºयावर आणले़ घटनेची माहिती मिळताच पथक घटनास्थळी दाखल झाले होते़ त्यात देवपूर पोलीस ठाण्याचे हेड कॉन्स्टेबल बी़ बी़ बागुल, एस़ बी़ चिंचोलीकर, आय़ एऩ इशी, पी़ सी़ आखडमल, राठोड तर शहर पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक शरद पाटील, हेड कॉन्स्टेबल पंकज खैरमोडे यांचा समावेश होता़ पोलिसांनी घटनास्थळी येवून पाहणी केली़ मृत इसम हा पुराच्या पाण्यात वाहून आला असलातरी त्याची ओळख पटविणारे कुठलेही कागदपत्र किंवा अन्य साहित्य मृताजवळ आढळून न आल्याने अनोळखी म्हणून त्याची नोंद घेण्यात आली होती़ दरम्यान घटनास्थळी नागरीकांची गर्दी झाली होती़ नागरिकांना हटविण्याची वेळ पोलिसांवर आली़
पाय घसरुन पडला असावा - सायंकाळी त्याची ओळख पटली़ मोराणे येथील हिरामण चव्हाण हा गुरुवारपासून बेपत्ता होता़ मोराणे शिवारातून पांझरा नदी वाहते़ तो तेथे गेला असावा आणि पाय घसरुन नदीच्या पुराच्या पाण्यात बुडून मृत झाला असावा, असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे.

Web Title: Isma's body was swept away in the floodwaters

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Dhuleधुळे