धुळ्यात कचरा संकलनाचा प्रश्न मार्गी लागणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2017 12:17 PM2017-06-25T12:17:37+5:302017-06-25T12:17:37+5:30

तिस:यांदा मागविलेल्या निविदांचा विषय 7 महिन्यानंतर स्थायीत, बुधवारी होणार निर्णय

The issue of garbage collection will be needed? | धुळ्यात कचरा संकलनाचा प्रश्न मार्गी लागणार?

धुळ्यात कचरा संकलनाचा प्रश्न मार्गी लागणार?

Next

ऑनलाईन लोकमत

धुळे,दि.25 : शहरातील कचरा संकलनाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी तिस:यांदा मागविण्यात आलेल्या निविदा अखेर सात महिन्यानंतर मंजुरीसाठी 28 जूनला सकाळी 11 वाजता आयोजित स्थायी समितीच्या सभेत येणार आहेत़ त्यामुळे आता तरी कचरा संकलनाचा विषय मार्गी लागतो का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आह़े 
मनपाच्या तत्कालीन आयुक्त संगीता धायगुडे यांच्या आदेशाने नोव्हेंबर महिन्यात तिस:यांदा शहरातील चार भागांसाठी कचरा संकलनाच्या निविदा मागविण्यात आल्या़ तीन भागांसाठी प्रत्येकी तीन व एका भागासाठी दोन निविदा प्राप्तदेखील झाल्या़ मात्र, निविदा भरणा:या ठेकेदारांबाबतच काही पदाधिकारी व नगरसेवकांकडून तक्रारी आल्याने हा प्रश्न पुन्हा बारगळण्याची चिन्हे होती़; तर दुसरीकडे कचरा संकलनासाठी निविदा प्रक्रिया तांत्रिक मंजुरी न घेताच राबविण्यात आल्याचा आक्षेप मुख्य लेखापरीक्षकांनी घेतला होता़ 
दरम्यान, काही दिवसांपूर्वी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धुळ्यातील जाहीर सभेत पाणीपुरवठा, घनकचरा व्यवस्थापन व सांडपाणी प्रक्रिया हे तीन प्रश्न  प्राधान्याने व तत्काळ मार्गी लावण्याचे आदेश दिले होत़े त्यामुळे प्रलंबित पडून असलेल्या निविदांचा प्रश्न तत्कालीन आयुक्त संगीता धायगुडे यांनी हाती घेतला व त्यानंतर हा विषय सात महिन्यांच्या कालावधीनंतर स्थायी समितीच्या सभेत येत आह़े  सदर निविदांमध्ये केवळ ओला व सुका कचरा वेगवेगळा संकलन करणेच प्रस्तावित असून त्यासाठी अंदाजपत्रकात अडीच कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आह़े 

Web Title: The issue of garbage collection will be needed?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.