पाणी भरण्याचा वाद, तरुणाला मारहाण

By admin | Published: May 29, 2017 01:17 AM2017-05-29T01:17:37+5:302017-05-29T01:17:37+5:30

बोरीस येथील घटना : धुळे तालुका पोलीस ठाण्यात चौघांविरुद्ध गुन्हा दाखल

The issue of water logging, the assault of the young man | पाणी भरण्याचा वाद, तरुणाला मारहाण

पाणी भरण्याचा वाद, तरुणाला मारहाण

Next

धुळे : तालुक्यातील बोरीस येथे नळावर पाणी भरण्याच्या वादातून तरुणाला हाताबुक्क्यांनी मारहाण करून जातीवाचक शिवीगाळ केल्याची घटना शनिवारी सायंकाळी घडली़ याप्रकरणी सोनगीर पोलीस ठाण्यात चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आह़े
याबाबत मुकेश सुभाष पवार (रा़बोरीस, ता़धुळे) या तरुणाने सोनगीर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, शनिवारी दुपारी दोन वाजेच्या सुमारास गावातील दादाभाई पवार यांच्या नळावर पाणी भरण्याच्या कारणावरून मुकेश व पूनम बबलू पाटील (रा़बोरीस) या दोघांमध्ये वाद झाला़ त्यानंतर सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास पूनम पाटील हिने चिथावणी दिल्याने कौतीक यशवंत पाटील, मुन्ना कौतीक पाटील, बबलू कौतीक पाटील या तिघांनी मुकेश यास हाताबुक्क्यांनी मारहाण केली़ यात मुकेश याला मुकामार लागला़ तसेच त्याला जातीवाचक शिवीगाळ करून अपमानीत केल़े, असे फिर्यादीत नमूद केले आह़े यावरून वरील  चौघांविरुद्ध अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा कलम 1989 सुधारित अधिनियम सन 2016 चे कलम 3/1 आर एस 6 तसेच भादंवि कलम 323, 504, 506, 34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आह़े तपास उपविभागीय पोलीस अधिकारी नीलेश सोनवणे करीत आहेत़
नवडणे येथे एकास मारहाण
सामाईक रस्त्यावरून बैलगाडी नेल्याच्या कारणावरून संजय तान्हाजी देसले (रा़ कासारे, ता़ साक्री) यांना नवडणे शिवारातील शेट गट क्रमांक 302/3/1 च्या बांधावर किरण राजाराम देसले, सुभाष देसले व अन्य दोन महिला या चौघांनी हाताबुक्क्यांनी तसेच लाकडी दांडक्याने मारहाण करून जखमी केल़े ही घटना बुधवारी सकाळी 8़30 वाजेच्या सुमारास घडली़
याप्रकरणी संजयचे वडील तान्हाजी तळपत देसले यांनी साक्री पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून वरील चौघांविरुद्ध भादंवि कलम 324, 323, 504, 506, 34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आह़े
बेटावद येथे तरुणाला मारहाण
शिंदखेडा तालुक्यातील बेटावद येथील रहिवासी विजय हसरथ भिल या तरुणाने पोलीस ठाण्यात अर्ज दिल्याच्या कारणावरून त्याला शुक्रवारी रात्री आठ वाजेच्या सुमारास त्याच्या घरासमोर अजय दशरथ भिल, प्रकाश सुरेश भिल, राजू दशरथ भिल (रा़बेटावद) या तिघांनी हाताबुक्क्यांनी मारहाण करून शिवीगाळ केली, तसेच जीवे मारण्याची धमकी दिली़  याप्रकरणी त्याने नरडाणा पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून वरील तिघांविरुद्ध अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आह़े तपास पो़ना. फुलपगारे करीत आहेत़
कलमाडी येथे मारहाण
शिंदखेडा तालुक्यातील कलमाडी येथील रहिवासी योगेश भटू पाटील यांनी 25 मे रोजी विजेंद्र छबीलाल पाटीलसह इतरांविरुद्ध फिर्याद दिली होती़ याचे वाईट वाटून शनिवारी सकाळी 11 वाजेच्या सुमारास कलमाडी गावात शिवाजी चौकात योगेश पाटील यांना विजेंद्र पाटीलसह युवराज धुडकू पाटील, पुरुषोत्तम पाटील (रा़कलमाडी) या तिघांनी हाताबुक्क्यांनी मारहाण    करून शिवीगाळ केली व जीवे मारण्याची धमकी दिली़ याप्रकरणी त्याने नरडाणा पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून वरील तिघांविरुद्ध अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आह़े तपास पो़ना. मुजगे करीत आहेत़
कासारेत विहिरीत आढळला मृतदेह
 साक्री तालुक्यातील कासारे गाव शिवारातील गट क्रमांक 633 या शेतातील विहिरीत एका तरुणाचा मृतदेह पाण्यात तरंगताना आढळून आला़ त्याचे वय अंदाजे 25 ते 30 वर्षे वर्ष आह़े ही घटना शनिवारी सकाळी साडेनऊ वाजता उघडकीस आली़ संबंधित तरुण 2 ते 3 दिवसांपूर्वी विहिरीत पडला असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आह़े याबाबत किरण पन्नालाल भावसार (रा़कासारे) यांनी साक्री पोलीस ठाण्यात दिलेल्या माहितीवरून अकस्ताम मृत्यूची नोंद करण्यात आली आह़े तपास पो़ह़ेकॉ. पायमोडे करीत आहेत़

Web Title: The issue of water logging, the assault of the young man

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.