शिक्षकांना अवघड क्षेत्रात सेवा करणे अनिवार्य
By admin | Published: April 5, 2017 05:51 PM2017-04-05T17:51:11+5:302017-04-05T17:51:11+5:30
पेसा क्षेत्रातील जागा स्थानिक अनुसूचित जमातीतूनच भरल्या जाणार असल्यामुळे शिक्षकांना पेसा ऐवजी अवघड क्षेत्रात सेवा करणे अनिवार्य राहणार आहे.
Next
शिक्षकांच्या बदली प्रक्रिया : अवघड क्षेत्राचे फेर सव्रेक्षण
धुळे,दि.5- पूर्वी शिक्षकांना पेसा (आदिवासी क्षेत्र) क्षेत्रात सेवा करणे अनिवार्य होते. आता पेसा क्षेत्रातील जागा स्थानिक अनुसूचित जमातीतूनच भरल्या जाणार असल्यामुळे शिक्षकांना पेसा ऐवजी अवघड क्षेत्रात सेवा करणे अनिवार्य राहणार आहे. यासाठी जिल्हा परिषद प्रशासन व शिक्षण विभागाने अवघड क्षेत्राचे फेर सव्रेक्षण सुरू केले आहे.
अवघड क्षेत्राचे फेरसव्रेक्षण
शिक्षकांच्या बदल्यांसाठी जिल्हा परिषद प्रशासनाने अवघड क्षेत्र निश्चित केली आहेत, या अवघड क्षेत्राचे फेर सव्रेक्षण करण्याच्या सूचना मुख्य कार्यकारी अधिकारी ओमप्रकाश देशमुख यांनी दिल्या आहेत.
प्रशासनाची बैठक
जिल्ह्यातील अवघड क्षेत्रासंदर्भात चर्चा करण्यासाठी जिल्हा परिषद प्रशासनाची नुकतीच बैठक झाली. यावेळी धुळे, शिरपूर, साक्री, शिंदखेडा तालुक्यातील सर्व गटशिक्षणाधिकारी, सर्व गटविकास अधिकारी, उपअभियंता आणि शिक्षण विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
15 मे र्पयत बदल्या
शिक्षण विभागाकडून अवघड क्षेत्र जाहीर केल्यानंतर सर्वसाधारणपणे 15 मे र्पयत बदली प्रक्रिया पूर्ण करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्यादृष्टीने आवश्यक ती तयारीही जोरदार सुरू असल्याचे दिसून येत आहे.
जिल्ह्यातील अवघड क्षेत्राचे होणार फेरसव्रेक्षण
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी यांनी जिल्ह्यातील अवघड क्षेत्रांचे फेर सव्रेक्षण करण्यात येणार आहे. गटशिक्षणाधिकारी व अभियंता यांच्या माध्यमातून फेर सव्रेक्षण करूनच अंतिम गावे निश्चित केली जाणार आहेत. या गावांची यादी शिक्षण विभागाकडून जाहीर केल्यानंतरच जिल्हा अंतर्गत बदल्यांसाठी प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. त्यादृष्टीने फेरसव्रेक्षणाचे काम जोरात सुरू असल्याचे दिसून येत आहे.
सर्वसाधारणपणे शिरपूर आणि साक्री तालुक्यामधील जास्त गावे अवघड क्षेत्रात येण्याची शक्यता आहे. धुळे आणि शिंदखेडा तालुक्यामध्ये त्या तुलनेने दुर्गम गावे कमी प्रमाणात आहेत. तसेच साक्री आणि शिरपूर तालुक्यातील बहुतांश गावे ही पेसा क्षेत्रात येतात. त्यामुळे पेसा क्षेत्रातील गावे वगळूनच अवघड क्षेत्रातील गावे शिक्षण विभागाला निश्चित करावी लागणार आहेत.
अवघड क्षेत्र म्हणजे काय?
सर्वसाधारणपणे जे क्षेत्र तालुका मुख्यालयापासून दूर आहे. त्याला अवघड क्षेत्र असे संबोधण्यात आले आहे. आजही दळणवळणाच्या दृष्टीने त्या गावात व शाळेत पोहचण्यास सुविधा नाहीत, अशी गावेही अवघड क्षेत्रामध्ये घेण्यात येणार आहेत. सर्वसाधारणपणे ज्या गावामध्ये शिक्षक जाण्यास सहजासहजी तयार होत नाहीत ती गावे अवघड क्षेत्र म्हणून निश्चित केली जाणार आहेत.