धुळे येथील आयटीआयच्या विद्यार्थ्यांचे उपोषण मागे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 12, 2019 11:53 AM2019-12-12T11:53:16+5:302019-12-12T11:53:40+5:30

निकालाबाबत प्रयत्न करण्याचे प्रशासनातर्फे आश्वासन

ITI students fasting behind in Dhule | धुळे येथील आयटीआयच्या विद्यार्थ्यांचे उपोषण मागे

धुळे येथील आयटीआयच्या विद्यार्थ्यांचे उपोषण मागे

Next


आॅनलाइन लोकमत
धुळे :पेपरमध्ये नापास केलेल्या विद्यार्थ्यांना उत्तीर्ण करावे या मागणीसाठी धुळे येथील शासकीय आयटीआयच्या विद्यार्थ्यांनी सलग दुसऱ्या दिवशी आंदोलन करून कॉलेज काहीवेळ बंद केले होते. दरम्यान त्यांना तेथुन हुसकवण्यात आल्यानंतर अभाविपच्या नेतृत्वाखाली १२ जणांनी बुधवारी क्युमाईन क्लबसमोर आमरण उपोषण सुरू केले. दरम्यान सायंकाळी आयटीआय प्रशासनाकडून निकालाबाबत प्रयत्न करण्याचे आश्वासन मिळाल्यानंतर विद्यार्थ्यांनी उपोषण मागे घेतले.
‘आॅपरेटर अ‍ॅडव्हॉन्स मशीन टुल्स’ या विषयाचा थेअरी पेपर सप्टेंबर महिन्यात झाला. या परीक्षेचा निकाल काही दिवसांपूर्वी जाहीर करण्यात आला. त्यात थेअरी पेपर १ मध्ये सर्वच विद्यार्थी नापास झाले. या विद्यार्थ्यांनी प्राचार्यांकडे कैफियत मांडली. प्राचार्यांनी आयटीआयची परीक्षा घेणाºया यंत्रणेशी संपर्क साधला. तांत्रिक बाजूची पडताळणी केली. यावर विद्यार्थ्यांनी मुंबई येथील संचालक कार्यालयात निवेदन दिले. मात्र, यानंतरही अद्यापपर्यंत विद्यार्थ्यांचा निकालात कोणताच बदल झालेला नाही. विद्यार्थ्यांवर झालेल्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी अभाविपतर्फे आंदोलन करण्यात आले होते. बुधवारीही सकाळी विद्यार्थ्यांनी रास्तारोको केला. दरम्यान आंदोलनाची दखल घेत पोलीस त्याठिकाणी पोहचले. त्यांनी विद्यार्थ्यांची समजूत काढली.
मात्र जे विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले आहेत, त्यांच्या प्रश्नपत्रिका पुन्हा तपासण्यात याव्यात, त्यांना उत्तीर्ण करण्यात यावे, या मागणीसाठी अभाविपच्या नेतृत्वाखाली बुधवारी दुपारपासून क्युमाईन क्लबसमोर आमरण उपोषणास सुरूवात केली होती. विजय परमार, आकाश थोरात, निलेश अहिरे, जयेश पाटील, योगेश देवरे, उमेश देवरे, दिनेश पाटील, गंगाधर कोलमवार, अजय वाघ, निलेश हिळे हे ्रआमरण उपोषणास बसल्याची माहिती गंगाधर कोलमवार यांनी दिली.
जिल्हाधिकाऱ्यांनी
घेतला आढावा
दरम्यान या आंदोलनाबाबत सायंकाळी जिल्हाधिकारी गंगाथरन डी. यांनी आढावा घेतला. आयटीआयचे प्राचार्य एम.के.पाटील यांनी सविस्तर माहिती जिल्हाधिकाºयांना दिली. यावेळी पोलीस अधीक्षक विश्वास पांढरेही उपस्थित होते.
सायंकाळी उपोषण मागे
दरम्यान प्राचार्य पाटील यांनी सायंकाळी उपोषणकर्त्यांची भेट घेतली. तसेच निकालासंदर्भात आयटीआय प्रशासन प्रयत्न करेल असे आश्वासन दिल्यानंतर उपोषण मागे घेण्यात आले.

Web Title: ITI students fasting behind in Dhule

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Dhuleधुळे