जगदीशला सुवर्ण, निखिलला रौप्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 24, 2017 12:17 AM2017-11-24T00:17:44+5:302017-11-24T00:29:57+5:30
शालेय राष्ट्रीय कुस्ती : यजमान धुळेकरांची स्पर्धेवर छाप, महाराष्ट्राला तीन तर दिल्लीला पाच सुवर्ण
लोकमत न्यूज नेटवर्क
दादासाहेब रावल क्रीडानगरी/धुळे : यजमान धुळेकरांनी महाराष्ट्र संघातून खेळताना आंतरशालेय राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत दोन पदकांची कमाई केली. धुळ््याचा गोल्डन बॉय जगदीश रोकडे याने ग्रीकोरोमन ४२ किलोगटात सुवर्ण तर फ्री स्टाईल ४२ किलो गटात निखील माळी याने रौप्य पदकांची कमाई केली. गुरुवारी दिल्लीने पाच सुवर्ण तर महाराष्ट्र संघाने तीन सुवर्ण पदकांची कमाई केली.
जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयातर्फे आयोजित ६३व्या राष्ट्रीय शालेय कुस्ती स्पर्धेत गरुड संकुलातील जिल्हा क्रीडा संकुलात १७ वर्षाआतील राष्ट्रीय कुस्ती सुरू आहे. शुक्रवारी या स्पर्धेचा समारोप होणार आहे. मुलांच्या फ्रीस्टाईल व ग्रीक रोमन व मुलींच्या फ्री स्टाईल गटात स्पर्धा होत आहे.
राष्ट्रीय शालेय कुस्ती स्पर्धांना दुसºया दिवशीही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. कुस्ती बघण्यासाठी शहरासह परिसरातील नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. त्यामुळे खेळाडूंचाही उत्साह वाढलेला आहे. सकाळच्या सत्रात मुला-मुलींचे वेगवेगळ्या वजन गटात सामने झाले. प्रत्येक वजनगटात दोन तृतीय विजेते निवडण्यात आले. स्पर्धेतील प्रथम, द्वितीय व तृतीय विजेत्यांना अनुक्रमे सुवर्ण, रौप्य व कांस्य पदके देण्यात आली.
स्पर्धेचा वजन गटनिहाय निकाल (प्रथम, द्वितीय, तृतीय अनुक्रमे)
४२ किलो फ्रीस्टाईल- विशांत जे.सिंग (दिल्ली), निखिल माळी (धुळे, महाराष्ट्र ), एम.डी. अझर (तेलंगणा), नरेश (हरियाणा).
४२ किलो ग्रीक रोमन-जगदीश रोकडे (धुळे, महाराष्ट्र ), सूरज एस.(कर्नाटक), बिपीन पांडे (तेलंगणा), देव सतीशकुमार (हरियाणा). ५० किलो फ्रीस्टाईल- निखिल सारवन (महाराष्ट्र ), चंद्रमोहन (हरियाणा), जतीन (हिमाचल प्रदेश), अमन सोमबीर (दिल्ली). ५० किलो ग्रीक रोमन- संदीप क्रिष्णकुमार (दिल्ली), संदीप राजेश (सीबीएसई), मनोज गुणावत (महाराष्ट्र ), हरदीपसिंग (पंजाब). ५८ किलो फ्रीस्टाईल-अभिमन्यू (हरियाणा), प्रवीण देर (विद्याभारती), अजय वाबळे (महाराष्ट्र ), विशाल साहनी (उत्तर प्रदेश). ५८ किलो ग्रीक रोमन- रणजित जाधव (महाराष्ट्र), छोटूलाल रामानंद (दिल्ली), बी.गौतमक्रिष्णा (आंध्र प्रदेश), अभिमन्यू गुलाबसिंग (पंजाब).
३८ किलो मुली- रोशनी सोनकर (दिल्ली), स्रेहा खिहाडिया (गुजरात), प्रज्ञा एस.पानगरे (महाराष्ट्र ), गोपावम कोंडक (कर्नाटक).
४३ किलो मुली- सीमरन राजेश (दिल्ली), भारती खापेकर (गुजरात), महिमा राजू राठोड (महाराष्ट्र ), पिंकी नारायण (हरियाणा).
४९ किलो मुली- उन्नती राठोड (दिल्ली), निशू (हरियाणा), बी.राजेश्वरी (तेलंगणा), रेशमा मृगनट (कर्नाटक).