‘जलयुक्त’ची रखडलेली कामे मार्गी लागणार
By admin | Published: February 1, 2017 12:12 AM2017-02-01T00:12:55+5:302017-02-01T00:12:55+5:30
जलयुक्त शिवार अभियान योजनेंतर्गत पहिल्या व दुस:या टप्प्यातील रखडलली कामे आचारसंहितेचा अडसर दूर होताच मार्गी लागणार आहेत.
Next
धुळे : जिल्ह्यात जलयुक्त शिवार अभियान योजनेंतर्गत पहिल्या व दुस:या टप्प्यातील रखडलली कामे आचारसंहितेचा अडसर दूर होताच मार्गी लागणार आहेत.
जिल्ह्यात नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीमुळे 4 जानेवारीपासून आचारसंहिता सुरू असून 3 रोजी मतदानानंतर ती हटणार आहे.
महिनाभराच्या आचारसंहितेमुळे जिल्ह्यातील सुमारे 400 कामांना प्रारंभ होऊ शकलेला नाही. यातील काही कामांच्या निविदा तसेच काहींचे कार्यारंभ आदेश (वर्कऑर्डर) निघू शकले नव्हते.