बाम्हणे ग्रा़प़च्या सरंपच ज्योत्स्रा निकम यांना उदयोन्मुख नेतृत्व पुरस्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2019 04:09 PM2019-02-22T16:09:32+5:302019-02-22T16:10:11+5:30

केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ़ सुभाष भामरे यांच्या हस्ते सत्कार

Jnanesamy Nikam is honored with the emerging leadership award | बाम्हणे ग्रा़प़च्या सरंपच ज्योत्स्रा निकम यांना उदयोन्मुख नेतृत्व पुरस्कार

dhule

Next

शिंदखेडा तालुक्यातील बाम्हणे गाव दुष्काळी भागात मोडते. परंतु तरीही गावात नियमित व शुद्ध पाणीपुरवठा केला जातो. त्यासाठी गावापासून पाच कि.मी. अंतरावरील तापी नदीचे पाणी काठावर उभारलेल्या जलशुद्धीकरण केंद्रात स्वच्छ करून पाईपलाईनद्वारे आणले आहे. सांडपाण्यासाठी गटारी असून भूमिगत गटारीही प्रस्तावित आहेत. गावात वीजपुरवठ्यासाठी हायमास्ट दिव्यांची सोय केली असून सौरऊर्जेवर चालणारे दिवे जास्तीत जास्त बविण्याचा ग्रा.पं.चा प्रयत्न आहे. गावात अंगणवाडीपासून १२वीपर्यंत शिक्षणाची व्यवस्था असून सरपंच ज्योत्स्रा निकम स्वत: माध्यमिक शाळेत शिक्षिका असल्याने शिक्षणाचा पाया भक्कम करण्याचा सातत्याने प्रयत्न होतो. विद्यार्थ्यांना विविध कार्यक्रमांत सहभागासाठी प्रोत्साहित केले जाते. गावात स्वच्छतेसाठी घंटागाडी उपलब्ध केली आहे.ग्रा.पं.चे स्वतंत्र मंगल कार्यालय, सुसज्ज सार्वजनिक वाचनालय आह. सांस्कृतिक वारसा जपण्यासाठी अक्षय तृतीयेला यात्रा भरविली जाते. पर्यावरण पुरस्कारामुळे जबाबदारी वाढल्याने २ हजार वृक्षांची लागवड करून संवर्धन करण्यात येत आहे. गावहद्दीत खाजगी उद्योगांना मंजुरी व बचत गटाच्या माध्यमातून रोजगार निर्मितीला हातभार लावण्यात येतो. कार्यकम केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ़ सुभाष भामरे यांच्या हस्ते संरपच सौ़निकम यांच्या सत्कार करण्यात आला़.
 

 

Web Title: Jnanesamy Nikam is honored with the emerging leadership award

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Dhuleधुळे