अवघ्या पाच रुपयांत जेवण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2019 12:20 PM2019-02-17T12:20:23+5:302019-02-17T12:21:02+5:30

रमाई पोळी-भाजी केंद्र : एका अभिनव उपक्रमाला उत्स्फुर्त प्रतिसाद

Just five rupees lunch | अवघ्या पाच रुपयांत जेवण

अवघ्या पाच रुपयांत जेवण

Next

चंद्रकांत सोनार । 
लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : तालुक्यातील मोराणे येथील डॉ़ बाबासाहेब आंबेडकर समाजकार्य महाविद्यालयात रमाई पोळी-भाजी केंद्र सुरु झाले़ अवघ्या ५ रुपयात त्याचा लाभ मिळत असल्याने या अभिनव उपक्रमाला उत्स्फुर्त प्रतिसाद मिळू लागला आहे़ या उपक्रमाचे अनुकरण मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपिठात केले जात आहे, हे विशेष़
समता शिक्षण संस्था, पुणे संचलित डॉ़ बाबासाहेब आंबेडकर समाजकार्य महाविद्यालय मोराणे (ता़ धुळे) येथे ग्रामीण आणि आदिवासी भागासह मालेगाव, साक्री, शिरपूर यासारख्या ठिकाणाहून विद्यार्थी, विद्यार्थिनी आणि अनेकजणं ये-जा करत असतात़ जवळपास ८ तास ते महाविद्यालयात असतात़ यातील बºयेच विद्यार्थी तर पहाटे ५ वाजेच्या सुमारास घर सोडतात़ त्यामुळे त्यांना घरुन जेवणाचा डबा आणणे शक्य होत नाही़ त्यांची आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्यामुळे बाहेर कुठे नास्ता अथवा जेवण करणे आर्थिकदृष्ट्या त्यांना परवडत नाही़ विद्यार्थी उपाशीपोटी शिक्षण घेवू शकत नाही़ ही मुलभूत गरज लक्षात घेता संस्थेचे सचिव प्रा़ विलास वाघ यांनी एक अभिनव संकल्पना मांडली आणि रमाई पोळी-भाजी केंद्र या उपक्रमाला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ़ जालिंदर अडसुळे यांनी अस्तित्वात आणले़ 
प्राचार्य डॉ़ जालिंदर अडसुळे आणि प्रा़ रचना अडसुळे या दाम्पत्याच्या पुढाकाराने साजिद शेख यांच्या पुढाकाराने अहोरात्र प्रयत्न करुन १ जुलै २०१७ रोजी रमाई पोळी-भाजी केंद्राची सुरुवात झाली़ त्या दिवसांपासून आजतागायत हे केंद्र सुरु आहे़ अनेक जण त्याचा आनंदाने लाभ घेऊन आपली भूक भागवित आहेत़ महाविद्यालयाचे प्राध्यापक, प्राध्यापिका, शिक्षकेतर कर्मचारी यांनी सहभाग घेतला आहे़ 
रमाई पोळी-भाजी केंद्र हा स्वप्नपूर्ती प्रकल्प अस्तित्वात आणण्यासाठी तसेच तो कायमस्वरुपी चालविण्यासाठी एक योजना आखण्यात आली़ केवळ ५ रुपये नाममात्र दराने पोळी-भाजी देण्याचे ठरविण्यात आले़ त्यासाठी प्रथम गरीब आणि गरजू विद्यार्थ्यांची यादी करण्यात आली़ विद्यार्थ्यांची माहिती घेण्यासाठी एक सर्व्हेक्षणाचा अर्ज तयार करण्यात आला़ विद्यार्थ्यांची खरी माहिती भरुन घेण्यासाठी प्रत्येक प्राध्यापकाने साधारणपणे चार विद्यार्थ्यांच्या घरी भेट देवून सर्वेक्षण अर्ज भरुन घेण्यात आले़ प्रत्येक लाभार्थी विद्यार्थ्याला सदरहू केंद्राच्या लाभाची यादी देण्यात आली़ अशा ४० विद्यार्थ्यांसाठी रमाई पोळी-भाजी केंद्र सुरु करण्यात आले़ आजच्या स्थितीत या उपक्रमाचा लाभ ७० विद्यार्थी घेत आहेत़ 

Web Title: Just five rupees lunch

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Dhuleधुळे