धुळे येथील काजवे पुलाचे काम त्वरित सुरू करावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2019 11:28 AM2019-08-27T11:28:07+5:302019-08-27T11:28:23+5:30
महाराष्टÑ नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे जिल्हा प्रशासनाला निवेदन
आॅनलाइन लोकमत
धुळे : पांझरा नदीवरील लहान पुलावरून वाहतूक बंद असल्याने, गावाबाहेरून बसेस बसस्थानकात येत आहेत. त्यामुळे विद्यार्थ्याचे मोठ्या प्रमाणावर हाल होत आहे. त्यामुळे काजवे पुलाचे काम त्वरित सुरू करण्याची मागणी महाराष्टÑ नवनिर्माण विद्यार्थी सेनेतर्फे आज जिल्हा प्रशासनाला दिलेल्या निवेदनाद्वारे करण्यात आली.
पांझरा नदीला ४ व ९ आॅगस्टला आलेल्या महापुरामुळे सावरकर पुतळ्यासमोरील काजवे पुलाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्यामुळे हा पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आल्याने, राज्य परिवहन महामंडळाच्या बसेस बायपासने गावाबाहेरून जात आहेत. शिरपूर, दोंडाईचा, शिंदखेडा याभागातून येणाऱ्या विद्यार्थ्यांना नगावबारी चौफुलीवरच उतरावे लागते. तेथून खाजगी वाहनाने शाळा, महाविद्यालयात जावे लगाते. त्यामुळे त्यांना शाळा, महाविद्यालयात पोहचण्यास उशीर होत असतो. तसेच मध्यवर्ती बसस्थानकात येणाºया प्रवाशांकडून तिकिटा व्यतिरिक्त १० रूपये जास्तीचे घेतले जातात. प्रवाशांना बसणारा हा भुर्दंड बंद करावा. तसेच काजवे पुलाचे काम त्वरित करण्यात यावे. विद्यार्थ्यांचे होणारे हाल थांबवावेत. अन्यथा महाराष्टÑ नवनिर्माण सेना आंदोलन करेल असा इशारा देण्यात आला. यावेळी महाराष्टÑ नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर निदर्शने केली.
निवेदन देतेवेळी हर्षल परदेशी, गौरव गिते, यश शर्मा, राहूल मराठे, सत्यविजय गिरासे, गौरव माळी, तुषार हारणे यांच्यासह विद्यार्थी उपस्थित होते.