‘खाकी’ला आता ‘सीसीटीव्ही’ची मिळणार साथ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2020 10:10 PM2020-04-13T22:10:45+5:302020-04-13T22:11:01+5:30

जिल्ह्यातील पाच सीमांवर कॅमेरे लावले : जिल्ह्याचा ग्रीनझोन कायम ठेवण्यासाठी महामार्गांची सुरक्षा वाढविली

Khaki will now get CCTV | ‘खाकी’ला आता ‘सीसीटीव्ही’ची मिळणार साथ

dhule

Next


लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी संचारबंदीसह जिल्ह्याच्या सीमाही बंद करण्यात आल्या आहेत. असे असतांनाही अनेक वाहनधारक पोलिसांची नजर चुकवून जिल्ह्याच्या सीमा पार करीत असल्याचे निदर्शनास आले आहे. चोरीमार्गाने येणाऱ्या वाहनधारकांवर लक्ष ठेवण्यासाठी जिल्ह्यातील पाचही सीमांवर आता सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहे.
राज्यात कोरोनाबाधित रूग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. साक्री, जळगाव येथे कोरोनाबाधितांचा मृत्यू झाल्याने, खळबळ उडाली आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य शासनाने लॉकडाउनची मुदत ३०एप्रिलपर्यंत वाढवलेली आहे. इतर शहरातील कोरोनाचा प्रादुर्भाव जिल्ह्यात होऊ नये यासाठी राज्यातील सर्व सीमा सील केलेल्या आहेत.
शहरातील सीमा बंद असतांनाही महापालिकेच्या म्हणण्यानुसार पुणे, मुंबई शहरातून काही नागरिकांनी शहरात छुप्या पध्दतीने प्रवेश घेतल्याने जिल्ह्याची लक्ष्मणरेषा असुरक्षित असल्याचे वृत्त ‘लोकमत’ने प्रसिध्द केले होते़
सीसीटीव्हीची करडी नजर
या वृत्ताची पोलिस विभागाकडून दखल घेण्यात आली़ मुंबई -आग्रा महामार्गावरील बिजासनी देवी मंदिर, आर्वी तालुका पोलिस स्टेशन, मालेगावरोडवरील अजनाळे, पारोळा रोडवरील मुकटी, चाळीसगाव रोडवरील तरवाडे गाव अशा ठिकाणी चोख पोलिस बंदोबस्त तैनात केला आहे़ तसेच त्याठिकाणी आता सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत़
महामार्गावर कसुन चौकशी
शहरालगत कोरोना बाधित रूग्ण आढळून आल्याने महामार्गावरून येणाºया वाहन चालकांची कसून चौकशी केली जात आहे़ तसेच जे नागरिक बाहेरगावाहून धुळ्यात आले आहेत त्यांनी आपली वैद्यकीय तपासणी करुन घ्यावी, माहिती कळवावी, असे आवाहन केले आहे़

Web Title: Khaki will now get CCTV

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Dhuleधुळे