पूर्ववैमनस्यातून दोघांवर चाकू हल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 5, 2020 10:14 PM2020-01-05T22:14:24+5:302020-01-05T22:14:51+5:30

सात जणांविरुध्द गुन्हा : जखमींवर धुळ्यात उपचार

Knife attack on both of them in the East | पूर्ववैमनस्यातून दोघांवर चाकू हल्ला

पूर्ववैमनस्यातून दोघांवर चाकू हल्ला

Next

धुळे : मागील भांडणाची कुरापत काढून दोघांवर चाकूसारख्या धारदार शस्त्राने हल्ला केल्याची घटना चाळीसगाव येथील भडगाव रोडवरील एकावर हॉटेलजवळ ३ जानेवारी रोजी सकाळी घडली़ जखमींवर धुळ्यातील जवाहर मेडीकल कॉलेजमध्ये प्राथमिक उपचार करण्यात आल्याने, घटनेची नोंद धुळे तालुका पोलीस ठाण्यात केल्यानंतर गुन्हा चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनला वर्ग करण्यात आला़
चाळीसगाव येथील घाटरोड भागात राहणारा सिद्धांत आनंदा कोळी (२३) या तरुणाने पोलिसात फिर्याद दिली आहे़ त्यानुसार, मागील भांडणाची कुरापत काढत त्याला संशयित आरोपींनी जातीवाचक शिवीगाळ केली.एवढ्यावरच न थांबता चाकूसारख्या धारदार शस्त्राने हल्ला केल्याने पोटाला दुखापत झाली आहे़ तर भांडण सोडविण्यासाठी आलेल्या वसंत राजेंद्र बच्छाव यांनाही मारहाण करुन त्यांच्या डोक्यावर चाकूने वार करण्यात आला़ वाद विकोपाला जात असल्यामुळे याच ठिकाणी असलेले दुकानदार उमेश नथ्थू कळथे, गणेश भोसले यांनी मध्यस्थी करीत भांडण सोडविले़ घटनेनंतर सिद्धांत कोळी, व वसंत बच्छाव या दोघांना जवाहर मेडीकल कॉलेजच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. या घटनेची प्राथमिक नोंद धुळे तालुका पोलीस ठाण्यात ४ जानेवारी रोजी रात्री १० वाजेच्या सुमारास घेण्यात आली.याप्रकरणी धुळे तालुका पोलीस स्टेशनला पवन रमेश चव्हाण, रोहन रमेश चव्हाण यांच्यासह अन्य पाचजण (सर्व रा. चाळीसगाव) यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, हाणामारीची ही घटना चाळीसगाव शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली असल्यामुळे हा गुन्ह्याची प्राथमिक नोंद धुळे तालुका पोलीस ठाण्यात केल्यानंतर हा गुन्हा चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आला़

Web Title: Knife attack on both of them in the East

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Dhuleधुळे