पैशांच्या वादातून एकावर चाकूहल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 10, 2020 10:30 PM2020-05-10T22:30:57+5:302020-05-10T22:31:19+5:30

साक्री रोड: टरबूज व्यवहारामुळे वाद

Knife attack on one of the money disputes | पैशांच्या वादातून एकावर चाकूहल्ला

पैशांच्या वादातून एकावर चाकूहल्ला

Next

धुळे : टरबुजाच्या पैशांच्या देवाण-घेवाणवरुन वाद झाल्याने त्याचे पडसाद हाणामारीत झाले़ यावेळी चाकूने हल्ला केल्याची घटना ६ मे रोजी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास साक्री रोडवरील जोरावरअली सोसायटी येथे घडली़ याप्रकरणी ३ जणांविरुध्द गुन्हा दाखल झाला़
हाताबुक्यांनी मारहाण करण्यात आली़ यावेळी हातातील कलिंगड आणि मातीचे भांडे फेकून मारल्याने एकाला गुडघ्याला दुखापत झाली़ हाणामारी एकाचा चष्मा फुटला़ अशातच थेट चाकू काढून हल्ला केल्याने तणावाची अधिकच परिस्थिती निर्माण झाली़
यावेळी पळापळ देखील झाली़ चाकूने पोटावर आणि पाठीवर वार झाल्याने गंभीर दुखापत झाली़ या झटापटीत १५ वर्षाचा प्रणव राजेंद्र वाणी यालाही चाकूने पाठीवर झाल्याने दुखापत झाली आहे़ या घटनेनंतर जखमी झालेल्या सर्वांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत़ याप्रकरणी चंदुलाल बाबुलाल वाणी (४७, रा़ उभंड, ता़ धुळे) यांनी शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली़
त्यानुसार, योगेश हनुमंत भोकरे, रोहित हनुमंत भोकरे, अनिता हनुमंत भोकरे (सर्व रा़ जोरावरअली सोसायटी, साक्री रोड, धुळे) यांच्याविरुध्द भादंवि कलम ३०७, ३३७, २९४, ३९३, ३९७, ४२७, ३२३, ५०४, ५०६, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ सहायक पोलीस निरीक्षक एस़ पी़ तिगोटे घटनेचा तपास करीत आहेत़

Web Title: Knife attack on one of the money disputes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Dhuleधुळे