ॅडिजिटलच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना ज्ञानाचे धडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2019 12:07 PM2019-12-23T12:07:05+5:302019-12-23T12:07:25+5:30

खलाणे येथील जि.प. शाळा :वर्षभर विविध नावीन्य उपक्रम राबविण्यावर भर, विद्यार्थ्यांची उपस्थिती वाढली

Knowledge lessons for students through digital | ॅडिजिटलच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना ज्ञानाचे धडे

ॅडिजिटलच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना ज्ञानाचे धडे

Next

आॅनलाइन लोकमत
अतुल जोशी
धुळे :ग्रामीण भागातील जिल्हा परिषदेच्या शाळा म्हणजे ओबडधोबड खोल्या..अस्वच्छता असेच चित्र अनेक ठिकाणी बघावयास मिळते. मात्र शिंदखेडा तालुक्यातील खलाणे जिल्हा परिषद शाळा याला अपवाद आहे. या शाळेचा परिसर हिरवागार असून, शाळेच्या बोलक्या भिंती लक्षवेधक ठरतात. विशेष म्हणजे या शाळेतील शिक्षक विद्यार्थ्यांना डिजीटलच्या माध्यमातून अध्यापन करीत असतात. शाळेत वर्षभर विविध प्रयोग राबविण्यात येतात. त्यामुळे विद्यार्थ्याची उपस्थितीही ९५ टक्यांपेक्षा अधिक असते. तालुक्यात ही शाळा आदर्श ठरलेली आहे.
जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये साधारणत : प्रत्येक वर्गाची एकेकच तुकडी असते. मात्र या शाळेत पहिलीच्या तीन, दुसरी, तिसरीच्या दोन-दोन व चौथीच्या तीन तुकड्या आहेत. शाळेत २७३ विद्यार्थी असून एक पदोन्नती मुख्याध्यापक व ११ शिक्षक आहेत. शाळेने गेल्या तीन वर्षात ‘अ’ श्रेणी दर्जा प्राप्त केली आहे. शाळा सिद्धि मूल्यांकनात शाळेने यावर्षीही ‘अ’ श्रेणी प्राप्त केली आहे. ही शाळा डिजीटल आहे. शाळेत एलसीडी व टॅब आहेत. तसेच साऊंड सिस्टिम असल्यामुळे सर्व वर्गशिक्षक आपापल्या विद्यार्थ्यांना डिजिटलसाधनांच्या माध्यमातून अध्यापन करतात. विद्यार्थी देखील या संसाधनाचा स्वयंस्फूर्तपणे वापर करत असतात. शाळेत चांद्रयान-२ चे लाइव्ह प्रक्षेपण विद्यार्थ्यांना दाखविले होते. शाळेच्या प्रवेशद्वारा पासूनच बाह्यांग हे बोलके व सचित्र सुंदर अशा तैलरंगांनी रंगविले आहे. त्याचप्रमाणे प्रत्येक वर्गाच्या वर्गखोल्या वर्गाच्या अध्ययन निष्पत्तीनुसार रंगविलेल्या आहेत. त्यामुळे शाळेत प्रसन्न वातावरण असते. शाळेत छोटीशी बाग असून, परिसर आल्हादायक आहे. शाळेत विद्यार्थ्यांची उपस्थिती ९५ टक्के असते.
शाळेतील शिक्षक कैलास वाघ यांनी ‘माझी सुंदर शाळा खलाणे’ नावाने ब्लॉग तयार केला.तसेच फेसबुक पेजही तयार केले असून, युट्युबरही ही शाळा आहे. त्यामुळे शाळा आंतरराष्टÑीयस्तरावर पोहचली.
‘आमची शाळा आमचे उपक्रम’ या शिर्षकाखाली नवनवीन उपक्रम राबविले जातात. २४ डिसेंबर २०१८ पासून ‘शामची आई’कथामाला सुरू केली. या कथा मालिकेतून शिक्षक व विद्यार्थ्यांना संस्काराची जणू शिदोरीच मिळाली. या कथामालेचे अनेकांनी कौतुक केले.

Web Title: Knowledge lessons for students through digital

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.