राष्ट्रीय शूटिंगबॉल स्पर्धेसाठी राज्याचे संघ जाहीर कर्णधारपदी कोल्हापूरचा रणजित पाटील, सोलापूरची अनम रंगरेज

By अतुल जोशी | Published: January 10, 2024 04:59 PM2024-01-10T16:59:21+5:302024-01-10T16:59:53+5:30

मुलांच्या गटात कोल्हापूरचा रणजित पाटील व मुलींच्या गटातून सोलापूरची अनम रंगरेजकडे कर्णधारपद सोपविण्यात आले.

Kolhapur's Ranjit Patil, Solapur's Anam Rangrej announced as state team captains for national shooting ball tournament | राष्ट्रीय शूटिंगबॉल स्पर्धेसाठी राज्याचे संघ जाहीर कर्णधारपदी कोल्हापूरचा रणजित पाटील, सोलापूरची अनम रंगरेज

राष्ट्रीय शूटिंगबॉल स्पर्धेसाठी राज्याचे संघ जाहीर कर्णधारपदी कोल्हापूरचा रणजित पाटील, सोलापूरची अनम रंगरेज

धुळे : राज्य शूटिंगबॉल असोसिएशनच्या मान्यतेने, हौशी शूटिंगबॉल असोसिएशन, धुळे व आदर्श ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने धुळे शहराच्या मोहाडी उपनगरातील श्री पिंपळादेवी विद्यालयाच्या मैदानात १७ वर्षांआतील ३७ वी, राज्यस्तरीय सबज्युनिअर शूटिंगबॉल स्पर्धा पार पडली. त्यातून राष्ट्रीय स्पर्धेसाठी मुले व मुलींचे महाराष्ट्र राज्याचे दोन्ही संघ निवडण्यात आले. मुलांच्या गटात कोल्हापूरचा रणजित पाटील व मुलींच्या गटातून सोलापूरची अनम रंगरेजकडे कर्णधारपद सोपविण्यात आले.

राष्ट्रीय शूटिंगबॅाल स्पर्धा विजयवाडा (आंध्र प्रदेश) येथे फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात होणार आहे.

निवडलेला मुलांचा संघ- कर्णधार - रणजीत पाटील (कोल्हापूर), उपकर्णधार - श्रीहरी साठे, सक्षम कोळी (सोलापूर), वेदांत निकम, रोहण कांबळे (कोल्हापूर), शेख अबुजान समीर (अहमदनगर), रोहित बारे (जळगाव), सार्थक शिंदे (औरंगाबाद), विठ्ठल कदम (परभणी), सचिन ठोंबरे (औरंगाबाद), रोहित ठाकरे (जळगाव), कार्तिक वाघ (धुळे), राखीव - निरज देवरे (नंदुरबार), गुरू गायकवाड (सोलापूर), जगंद शेख (अहमदनगर).

मुलींचा संघ- कर्णधार - अनम रंगरेज (सोलापूर), मृणाली ढोले (धुळे), राधिका सरनागिरे (लातूर), अंजली मळगे (सोलापूर), देवयानी मराठे (धुळे), नेहा धनगर (औरंगाबाद), मयूरी मोकळे (औरंगाबाद मनपा), भाग्यश्री सूर्यवंशी (लातूर), पूजा राऊत (सोलापूर), वैष्णवी शर्मा (धुळे), अनुष्का चामटे (अमरावती), कृतिका पाटील (नाशिक), राखीव - कार्तिकी गडगडे (सोलापूर), अनुज ललवाणी (धुळे), जान्हवी नरवडे (औरंगाबाद) यांचा समावेश आहे. 

Web Title: Kolhapur's Ranjit Patil, Solapur's Anam Rangrej announced as state team captains for national shooting ball tournament

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Dhuleधुळे