धुळ्यातील ‘माध्यमिक’मध्येही कोरानाचा प्रवेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 9, 2020 11:32 AM2020-09-09T11:32:20+5:302020-09-09T11:32:41+5:30

अभ्यागतांना १०पर्यंत प्रवेश नाही

Korana's entry in 'Madhyamik' in Dhule | धुळ्यातील ‘माध्यमिक’मध्येही कोरानाचा प्रवेश

धुळ्यातील ‘माध्यमिक’मध्येही कोरानाचा प्रवेश

Next


आॅनलाइन लोकमत
धुळे :जिल्हा परिषदेपाठोपाठ आाता जिल्हा कारागृहाशेजारी असलेल्या माध्यमिक शिक्षणाधिकारी कार्यालयात कोरोनाचा शिरकाव झाला आहे. कार्यालयातील एका कर्मचाऱ्याला कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे माध्यमिक शिक्षणाधिकारी कार्यालय १० पर्यंत अभ्यागतांसाठी बंद ठेवण्यात आले आहे.
माध्यमिक शिक्षणाधिकारी कार्यालयातील एक कर्मचारी कोरोनाबाधित आढळून आला आहे. कोरोनाचे संक्रमण पसरू नये यासाठी माध्यमिक शिक्षणाधिकारी कार्यालय १० सप्टेंबरपर्यंत अभ्यागतांसाठी बंद ठेवण्यात आले आहे. जिल्हा परिषदेच्या सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी ए. जे. तडवी यांच्या सूचनेनुसार माध्यमिक शिक्षणाधिकारी सुभाष बोरसे यांनी कार्यालयीन कर्मचाऱ्यांना काही सूचना केल्या आहेत. विधिमंडळाचे अधिवेशन सुरू असल्याने कार्यालयातील कर्मचाºयांची उपस्थिती ५० टक्के ठेवून कामकाज सुरू राहणार आहे. कार्यालयातील प्रत्येक कर्मचाºयाने भ्रमणध्वनी सुरू ठेवावे.तातडीच्या व आकस्मिक स्वरूपाच्या कामासाठी गरज भासल्यास कर्मचाºयांना बोलावण्यात येणार आहे. प्रत्येक कर्मचाºयांने काम करताना योग्य खबरदारी घ्यावी, अशी सूचना दिली आहे.

Web Title: Korana's entry in 'Madhyamik' in Dhule

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.