कुसुंब्यात लॉकडाऊन सर्व व्यवहार ठप्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2020 10:34 PM2020-07-24T22:34:25+5:302020-07-24T22:35:02+5:30

कोरोना : १४ दिवसासाठी असणार नियम

In Kusumba, all transactions are jammed | कुसुंब्यात लॉकडाऊन सर्व व्यवहार ठप्प

कुसुंब्यात लॉकडाऊन सर्व व्यवहार ठप्प

googlenewsNext

कुसुंबा : कोरोना विषाणूचा संसर्ग दिवसेंदिवस वाढत आहे़ त्याला अटकाव करण्यासाठी शुक्रवारपासून पुढील १४ दिवस धुळे तालुक्यातील कुसुंबा येथे लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे़ तहसीलदार किशोर कदम यांनी जाहीर केले़
त्या अनुषंगाने कुसुंबा गावात सर्व व्यापारी आणि इतर सर्व प्रकारचे लहान-मोठे प्रतिष्ठाने या सर्वांनी ७ आॅगस्ट पर्यंत आपल्या व्यापारी आस्थापना पूर्णत: बंद ठेवायच्या आहेत़ गावातील सर्व ग्रामस्थांनी संचारबंदी आदेशाचा पालन करत आरोग्यविषयक सर्व प्रकारचे नियम पूर्णपणे पाळायचे आहेत़ प्रतिबंधात्मक आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्तींवर वा अशा व्यापारी वर्गावर कडक स्वरूपाची कार्यवाही करण्यात येईल़ कोणत्याही परिस्थितीमध्ये गावातील सर्वांनी नियमांचे पालन करावे़ प्रतिबंधात्मक आदेशाचे पालन करणे कायद्याने बंधनकारक आहे़ गावात केवळ दवाखाना व त्यास लागून असलेली औषधांची दुकाने सुरु राहतील़ त्यात मेडिकल सकाळी ७ ते दुपारी २ वाजेपर्यंत खुले राहतील़
तसेच शुक्रवारी दिवसभर गावातील राष्ट्रवादी, भाजप आणि इतर सामाजिक संघटनेने गावात स्वखर्चाने फवारणी केली. याकामी कुसुंबा तलाठी एस़ जी़ सूर्यवंशी, ग्रामसेवक बी़ एस़ पाटील, प्राथमिक आरोग्य केंद्र कुसुंबा, प्राथमिक शिक्षक-शिक्षिका, आशा वर्कर, आरोग्य कर्मचारी हे सर्व लागू करण्यात आलेल्या बंदमध्ये सहभागी होत आहेत़ यावेळी प्राथमिक शिक्षक आणि शिक्षिका यांनी घरोघरी जाऊन गावातील ग्रामस्थांचे सर्वे केला़ त्यांना माहिती दिली़

Web Title: In Kusumba, all transactions are jammed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Dhuleधुळे