मनपा लावणार प्रभागात ‘दिवे'
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 13, 2019 10:44 PM2019-09-13T22:44:28+5:302019-09-13T22:45:29+5:30
एलईडी : प्रस्तावाला मंजुरी
धुळे : शहराच्या सौदर्यात भर तसेच पन्नास टक्के विजेची बचत व्हावी यासाठी महापालिका आता प्रत्येक प्रभागात एलईडी पथदिवे लावणार आहे़ त्यामुळे प्रत्येक प्रभाग प्रकाश किरणांनी झगमगणार आहे़
नगरविकास विभागाच्या शासन निर्णयानुसार महापालिका तसेच नगर पालिका क्षेत्रामध्ये एलईडी पथदिवे बसविण्यासाठी शासनाने ईईएसएल कंपनीशी करारनामा करण्यात आला आहे़ महासभेत या कामांसाठी एनजी ईफोसीएन्सी सर्व्हिसेस लिमिटेड करार करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे़ या निर्णयामुळे महापालिका क्षेत्रातील वीजेची बचत होण्यासाठी जुने पथदिवे बदलुन एलएडी पथदिवे बसविण्यात येणार आहे़
शासनाने निश्चित केलेल्या गुणवत्तेनुसार एलईडी पथदिवे बसविले जाणार आहे़ त्यासाठी संपूर्ण शहरात सर्वेक्षण करून मुख्यरस्ते, जोड रस्ते, उपरस्त्यांची रूंदी प्रमाणे १५ मीटर १२ मीटर ९ मीटर रस्त्याच्या रूंदीमध्ये वर्गीकरण करून स्ट्रीट लाईट कोडचे एलईडी पथदिवे बसविण्यात येणार आहे़ कुठल्या रस्त्यावर किती क्षमतेचा एलईडीची गरजेचे त्यानुसार वीज खाब्यांवर पथदिवे बसविण्यात येणार आहे़ यापथदिव्याची विभागणी प्रभाग १ ते ५, प्रभाग ६ ते १०, प्रभाग ११ ते १५ व १६ ते १९ अशा चार विभागात केली आहे़ मनपाकडून डीपीआर तयार केला जाणार आहे़
पन्नास टक्के बचत
महापालिकेला सध्यास्थितीत ३५ ते ३८ लाख रूपये वीज बिलाची रक्कम भरावी लागते़ एलईडी पथदिव्यामुळे ५० टक्के विजेची बचत होणार आहे़ पाच वर्षापर्यत पथदिव्याची रिप्लेसशमेन्ट तसेच देखभाल दुरुस्तीचा खर्च कंपनीकडेच राहणार आहे़