लोणच्यासाठी कैऱ्यांची मोठी आवक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2019 10:21 PM2019-06-19T22:21:51+5:302019-06-19T22:22:29+5:30
महिलांची लगबग : विविध मसाले घेण्यासाठी दुकानांमध्ये गर्दी; २५० ते ३५० शेकडा दराने विकी
कुसुंबा : साधारणपणे जून महिन्यात पहिला पाऊस पडला की ग्रामीण भागात घरोघरी लोणच्याचा सुवास दरवळयाला लागतो. अद्याप अपेक्षित पाऊस पडला नसला तरी घराघरांत गृहिणींची मात्र लोणचे तयार करण्यासाठी लगबग सुरू झाली आहे. लोणच्यासाठी बाजारात कैºया दाखल होत असून २५० ते ३५० रुपये शेकडा दराने विक्री होत आहे. तर लोणचे साठविण्यासाठी चिनी मातीच्या बरण्यांनाही मागणी वाढली आहे.
लोणच्यासाठी लागणारी कैरी घेण्यासाठी बाजारपेठेत सध्या महिलांची गर्दी दिसू लागली आहे. मान्सूनपूर्व पावसाने परिसरात रिमझिम हजेरी लावल्याने लोणच्यासाठी लागणाºया कैºया घेण्यास नागरिकांनी सुरूवात केली आहे. यंदा कैऱ्यांची आवक कमी प्रमाणात आहे. साधारणपणे २५० ते ३५० रुपये शेकडा या भावाने कैºयांची विक्र होत आहे. लोणच्यासाठी लागणारे मसाल्याचे पदार्थही यंदा महागले आहेत. अतिशय दळदार आणि बाहेरून काळपट हिरवी ; परंतु आतून पांढरी शुभ्र, अशा कैरीला बाजारात मोठी मागणी आहे. ग्रामीण भागासह गुजरात राज्यातील सौराष्टतील लोणच्याच्या कैरीला मोठी मागणी आहे. बाजारातून कैरी विकत घेऊन त्या घरी स्वच्छ पाण्यात टाकली जातात. मग ती कैरी दुसºया दिवशी सकाळी धुऊन व पुसुन फोडली जाते. चमचमीत मसाला टाकून लोणचे तयार केले जाते. त्याचप्रमाणे हे लोणचे टाकण्यासाठी लागणाºया चिनी मातीच्या बरणीच्या दरातही मोठ्या प्रमाणात वाढ झाली असली. कैरी लोणच्यासोबतच लिंबु, आवळा, हिरवी मिरची आदींचेहे लोणचे टाकण्यात महिलांची लगबग सुरू आहे. पुर्वी मातीपासून तयार केलेल्या खा-यांमध्ये लोणचे भरले जायचे. मात्र, आता हळूहळू तो हद्दपार झाला आहे. स्थानिक व्यापाºयांनी हैदराबाद व गुजरात येथुन बरण्या मागविल्या आहेत. हे लोणचे दीर्घकाळ टिकते. ते बनविण्याचीही पूवार्पार एक पद्धत आहे. त्या पद्धतीताच अवलंब करून गृहिणी लोणचे बनविण्याचे काम करीत असतात.