विद्यार्थी घडविण्यात ‘ज्ञानगंगा अभ्यासिकेचा’ मोठा वाटा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 11, 2020 10:34 PM2020-01-11T22:34:34+5:302020-01-11T22:34:54+5:30

तळोद्याच्या प्राथमिक शिक्षकाचा असाही अभिनव उपक्रम

A large part of the 'Gyananga Ganga course' has been developed in the field of student development | विद्यार्थी घडविण्यात ‘ज्ञानगंगा अभ्यासिकेचा’ मोठा वाटा

विद्यार्थी घडविण्यात ‘ज्ञानगंगा अभ्यासिकेचा’ मोठा वाटा

Next

विशाल गांगुर्डे ।
पिंपळनेर : पिंंपळनेर शहरातील विविध परिवार, संस्थांच्या सामाजिक कार्याचा आदर्श घेत तसेच स्वत:ला स्पर्धा परिक्षांची तयारी करताना जागेचा, पुस्तकांचा आणि मार्गदर्शनाचा जो काही अभाव जाणवला तो आपल्या परिसरातील युवकांना जाणवू नये या उद्दात्त भावनेने पिंपळनेर येथील मुळ रहिवाशी आणि तळोदा तालुक्यातील धवळीविहीर येथील प्राथमिक शिक्षक अनिल सिताराम सोनवणे यांनी विद्यार्थ्यांसाठी ज्ञानगंगा अभ्यासिका सुरु केली आहे़ हे अभ्यास करणाऱ्या मुलांसाठी मोफत असून गेल्या चार वर्षापासून हा उपक्रम सुरु आहे़
मे २०१६ पासून लोकसहभाग आणि मित्रांच्या अनमोल सहकार्याने मोफत अभ्यासिका ही सटाणा रोडवरील महावीर भवनाजवळ सुरु आहे़ अगदी १० रुपये मदतीपासून पैशांच्या अभावात कार्याला सुरुवात झाली़ आजही रुमभाडे, वीज बिल, पुस्तके, मासिके, वर्तमान पत्रे यांची तरतूद स्वखर्चाने होत आहे़ अभ्यासिकेत राज्य शासन, सीबीएसई अभ्यासक्रम, स्पर्धा परिक्षा संदर्भग्रंथ मिळून ७० ते ८० हजारांची पुस्तके असून याठिकाणी सुमारे ५० विद्यार्थ्यांसाठी आसनाची सोय करण्यात आलेली आहे़ या अभ्यासिकेची वाटचाल डिजिटल करण्याकडे असून एक संगणक देखील येथे उपलब्ध करुन देण्यात आलेला आहे़ ज्याद्वारे विद्यार्थी परीक्षा फॉर्म भरणे, आॅनलाईन अभ्यासक्रम पाहुन स्वअध्ययनाचे कार्य करु शकतात़ अभ्यासिकेत घोडदे, कुडाशी, बोफखेल, दहिवेलचा परिसर तसेच पिंपळनेर शहरातील विद्यार्थी याठिकाणी येतात़आत्तापर्यंत ८ ते ९ विद्यार्थी विविध परिक्षामध्ये यशस्वी झाले आहेत़ शासकीय सेवेत कार्यरत आहेत़ तरीही अजूनही इच्छित कार्य वाढविण्यासाठी अभ्यासिका परिवाराला आर्थिक, भावनिक मदतीची गरज आहे़
मी स्वत: तळोदा तालुका येथे प्राथमिक शिक्षक पदावर कार्यरत असल्याने दररोज सकाळी ७ ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत अभ्यासिका चालविण्याचे कार्य तीन विद्यार्थी करीत आहेत़ दर रविवारी अथवा सुटीच्या दिवशी सकाळी ९ ते दुपारी ३ वाजेपर्यंत मार्गदर्शन सत्र घेण्यात येते़ विषयनिहाय तज्ञांचे मार्गदर्शन, यशस्वी उमेदवारांचा सत्कार सोहळा असे विविध कार्यक्रम नियमितपणे आयोजित करण्यात येतात़ तसेच पोलीस भरती, शिक्षक अथवा तलाठी परीक्षांमार्फत ४ ते ५ विद्यार्थी यावर्षी यशस्वी होतील अशी अपेक्षा नव्हे निश्चिती आहे़ नियमित सराव परीक्षा देखील घेण्यात येत असतात़
- अनिल सिताराम सोनवणे
प्राथमिक शिक्षक, जिल्हा परिषद,
धवळीविहीर ता़ तळोदा़

Web Title: A large part of the 'Gyananga Ganga course' has been developed in the field of student development

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Dhuleधुळे